Breaking News

पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावर पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

स्वामी नित्यानंद मार्गावर पद्मावती अपार्टमेंटसमोर पिण्याची पाइपलाइन लिकेज होऊन रस्त्यावर पाणी येऊ लागले होते. परिसरातील सोसायटीच्या रहिवाशांनी ही बाब नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा अपव्यय नको म्हणून विक्रांत पाटील यांनी लगेच पालिका अधिकार्‍यांशी बोलून त्वरित लिकेज असलेला पाइपलाइनचा भाग बदलून नवीन पाइप टाकून घेतला. या कार्यतत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply