Breaking News

ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी नवीन पॅटर्न; पूर्व नोंदणीशिवायही घेता येईल डोस

पनवेल : प्रतिनिधी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार खाजगी कोविड लसीकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न (लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आला. या पॅटर्नमध्ये पूर्व नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून कोविड लशीचा डोस घेता येणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्राचे लसीकरण व्यवस्थापक (सेशन मॅनेजर) यांची पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मंगळवारी (दि. 23) बैठक घेण्यात आली. नगरसेवक डॉ. अरूणकुमार भगत आणि पालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.

तिसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. खाजगी कोविड लसीकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या नियोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाबत केलेल्या सुचनांवरही या वेळी चर्चा करण्यात आली. अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न (लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्यात आल्या. लसींचा साठा, वेस्टेज दर कमी करण्याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकिस वैद्यकिय आरोग्य विभागाच्या डॉ. मनिषा चांडक, पालिका क्षेत्रात कोविड लसीकरण सुरू केलेल्या शासकिय आणि खाजगी लसीकरणकेंद्राचे व्यवस्थापक उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply