Breaking News

बंगळुरू संघ निळ्या जर्सीत दिसणार

बंगळुरू ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेेने संपूर्ण देशात कहर केला आहे. एकीकडे कोविड-19 विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकार, आस्थापना झटत आहेत, तर दुसरीकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळीही मदतीचा हात पुढे करीत आहेत. आता आयपीएल स्पर्धेत खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही या मोहिमेत सहभागी झाला असून, खेळाडू निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. कोरोना संकटात मोलाची जबाबदारी बजावण्यार्‍या फ्रंट लाईन कर्मचार्‍यांचे या माध्यमातून समर्थन केले जाणार आहे. संकट काळात ते करीत असलेल्या कामाची सर्वांना जाणीव करून दिली जाणार आहे. यासाठी विराटसेना निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. या जर्सीवर सर्व खेळाडूंची सही असून, सामन्यानंतर जर्सीचा लिलाव करण्यात येणार आहे. मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली जाणार आहे. बंगळुरूचा सोमवारी (दि. 3) कोलकातासोबत सामना आहे. या सामन्यात विराटसेना निळ्या जर्सीत दिसणार आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply