मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधान परिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.
ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा, तसेच भाजपची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे, तर सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही. कार्यक्रम पुढलिप्रमाणे असेल अधिसूचना जाहीर 16 नोव्हेंबर, अर्ज दाखल करण्याची तारीख 23 नोव्हेंबर, अर्जाची छाननी 24 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर, मतदान 10 डिसेंबर, मतमोजणी 14 डिसेंबरला होईल.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper