Breaking News

खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर

खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करावे, अशी मागणी भाजप खारघरच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या क्लीन मार्शल पथकाने खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केले. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघरमधील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. खारघरमध्ये पनवेल महापालिकेचे अतिक्रमण पथक आहे, मात्र या अतिक्रमण पथकाकडून खारघर आणि तळोजा परिसर मोठा असल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर योग्यप्रकारे कारवाई केली जात नाही. खारघरमध्ये सिडकोने फेरीवाल्यांसाठी भूखंड उपलब्ध करूनदेखील बहुतांश फेरीवाले पदपथ अडवून व्यवसाय करीत असल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप खारघरच्या शिष्टमंडळाने केली जात होती. त्यानुसार पनवेल महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र्य एजन्सीची नेमणूक केलेल्या क्लीन मार्शल पथकाने महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर सेक्टर 7, 11, 12, 18, 19 आदी भागात पदपथावर व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यांचे साहित्य जप्त केल्याने अनधिकृत फेरीवाले धास्तावले आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 10 जानेवारीपासून कठोर निर्बंध लागू केले असून, हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, मात्र खारघरमध्ये काही हॉटेल, चायनीज गाड्या सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पनवेल महापालिका आणि खारघर पोलीस प्रशासनाने मोहीम राबवून दोन दिवसांत रात्री 10 नंतर जमावबंदी कायदा मोडणार्‍या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्या रेस्टॉरंटवर कारवाई करून 67,700 रुपये दंड वसूल केल्याने हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply