Breaking News

Monthly Archives: November 2019

ग्रामपंचायत पोटनिवडणूक नऊ ठिकाणी अर्ज मागे

पनवेल : बातमीदार तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 10 नामनिर्देशित अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी नऊ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर आपटा ग्रामपंचायतीसाठी केवळ एक अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. पनवेल तालुक्यात कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत …

Read More »

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

पनवेल : बातमीदार तळोजातील एका 10 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे. इम्तियाज आलमगीर कुवारी (वय 59) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला 28 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तळोजा फेज-1 येथील भूमी ठाकूर या 10 वर्षीय मुलीला आरोपी स्कूटीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत …

Read More »

पनवेल मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांची फसवणूक

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील मच्छीमार्केटमध्ये वजनकाट्यात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे मांसाहारी खवय्यांत खळबळ उडाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक मच्छीमार्केट आहेत. त्यातील गुणे हॉस्पिटलजवळ असलेल्या मच्छीमार्केटमध्ये वजनावर मच्छी घेणार्‍या ग्राहकांची विक्रेत्यांकडून  फसवणूक केली जाते. वजनकाट्याच्या खालील बाजूला प्लास्टिक पिशवीत दगड किंवा …

Read More »

जांभूळपाड्यातील महावितरणची डीपी धोकादायक

विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका, संरक्षण भिंत उभारण्याची मागणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील मराठी शाळा व अंगणवाडीजवळ असलेली विद्युत डीपी (रोहित्र) चोहूबाजुने उघडी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या डीपी भोवती स्वखर्चाने संरक्षक भिंत उभी करण्यासाठी आवश्यक ती परवानगी द्यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत (आबा) …

Read More »

मशिदीशेजारील स्विमींगपुलाचे बांधकाम तोडले

माथेरान पालिकेची कारवाई कर्जत : बातमीदार माथेरानमधील जामा मशीद शेजारील खान हॉटेल मालकाने अनधिकृतपणे स्विमींग पुलाचे बांधकाम सुरु केले होते, त्यासंदर्भात येथील मुस्लीम समाजाने नगर परिषदेकडे एक महिन्यापुर्वीच लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. नगर परिषदेने धडक कारवाई करत येथे झालेले बांधकाम पाडण्यात आले. या मशीदी शेजारी उभारण्यात येणार्‍या स्विमिंग …

Read More »

नुकसानभरपाई वाटप सुरू

16 हजार 140 शेतकर्‍यांना चार कोटी 56 लाखांचा निधी वितरित अलिबाग ़: प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप सुरु झाले आहे. रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी 17 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील चार कोटी 56 लाख रुपयांच्या निधीचे वितरण पुर्ण झाले आहे. ही रक्कम …

Read More »

कशेळे ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

‘राजा शिवछत्रपती परिवार‘चा उपक्रम कर्जत : बातमीदार ‘राजा शिवछत्रपती परिवार‘ या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आणि परिसरात मंगळवारी (दि. 26) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात संस्थेच्या 50हुन अधिक सदस्यांनी हातात फावडे, टिकाव, आणि लोखंडी पंजे घेऊन सहभाग घेतला होता. ग्रामस्थदेखील या मोहीमेत सहभागी झाले होते. तर कशेळे …

Read More »

महाडमध्ये संविधान दिन साजरा

महाड ़:  प्रतिनिधी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (दि. 26) महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात संविधान दिनाच्या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील महसूल तसेच पंचायत समिती कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान  26 नोव्हेंबर 1949 …

Read More »

खोपोलीत लाठीकाठीने हल्ला

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी खालापूर : प्रतिनिधी खोपोलीनजीकच्या साजगाव येथे सुभाष प्रीमियर या कंपनीच्या नव्याने सुरू असणार्‍या कामाचा ठेका मिळविण्यावरून झालेल्या हाणामारीत सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार आरोपींना खोपोली पोलिसांनी अटक केली असून, फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरु आहे. सुभाष प्रीमियर या …

Read More »

चिंचवली येथे जागेच्या वादातून हाणामारी

नवरा-बायको दोघेही जखमी, चार जणांवर गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार नेरळ – कर्जत या दोन्ही शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले चिंचवली येथे जुन्या जागेच्या रागातून वाद निर्माण झाला. हा वाद  विकोपाला जावून झालेल्या हाणामारीत नवरा, बायको दोघेही जखमी झाले आहेत. तर मारहाण करणार्‍या चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात …

Read More »