Breaking News

Monthly Archives: November 2019

जिल्ह्यात भातशेतीचे 27 टक्के नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17 टक्के भातशेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे 10 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू करण्यात …

Read More »

16 संघांना मिळाले विश्वचषक स्पर्धेचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियामध्ये 2020 साली होणार्‍या टी-20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेतील सगळे संघ आता निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी 20 क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित सहा …

Read More »

चहा नाही, कॉफी पिते!

अनुष्काने सर्व आरोप फेटाळले नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषकादरम्यान बीसीसीआयच्या निवड समितीतील काही सदस्यांना मी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला चहा सर्व्ह करताना पाहिले, असा दावा करून भारताचे माजी यष्टिरक्षक फारूख इंजिनीअर यांनी खळबळ उडवून दिली असताना अनुष्का शर्माने ट्विटरवर एक विस्तृत पोस्ट लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिले …

Read More »

नवीन पनवेल ः येथील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त ‘किल्ले श्री राजगड’ची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या ठिकाणी मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सिडको आरक्षित पोलीस मैदानावर सेक्टर सात येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली. तसेच श्री राजगडची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

Read More »

पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे ‘रन फॉर युनिटी’

पनवेल : रामप्रहर वृत्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 31) ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एकूण 30 सभासदांनी सहभाग नोंदविला. दोन किमीच्या या रॅलीची रामचंद्र मिशन सेक्टर 15 येथे सांगता झाली. या वेळी संघाचे …

Read More »

जवानाची आत्महत्त्या

पनवेल : तळोजा येथील रॅपीड अ‍ॅक्शन फोर्समधील सुनील भोये (35) या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कौटुंबिक कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृत सुनील भोये हे तळोजा येथील रॅपीड अ‍ॅक्शन …

Read More »

पीएमसी बँक ः आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. कुलदीपकौर विग (64) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. दरम्यान, कुलदीपकौर या पीएमसी …

Read More »

एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्‍या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …

Read More »

पनवेलमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पनवेल : वार्ताहर परतीच्या पावसाने झालेल्या पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल, अशीही …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय माथेरान

कर्जत ः बातमीदार पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाल्याने मुलांना दिवाळीची सुटी पडताच मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील सुंदर थंड हवेचे डेस्टीनेशन माथेरान सध्या पर्यटकांच्या वर्दळीने बहर घेत आहे. आधीच लांबलेल्या पावसाने दिवाळीच्या पहिल्या दिवशीच विश्रांती घेतल्याने येथील परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेला असताना हिरवीगार …

Read More »