Breaking News

Monthly Archives: November 2019

समाजमाध्यमांमुळे एकाकी

मानवप्राणी हा सामाजिक प्राणी असून समवयस्क मित्रमंडळींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, देवाणघेवाण या त्याच्या नैसर्गिक गरजा आहेत. समाजमाध्यमांतून हा संपर्क, संवाद साधला जातो असा आभास निर्माण होत असला तरी समाजमाध्यमे ही तितकीच तुम्हाला एकाकी करणारीही असू शकतात असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघतो आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाची चुणूक एव्हाना सर्वच क्षेत्रांमध्ये कळून …

Read More »

नुकसानभरपाई घेण्यात पोलादपुरातील शेतकर्यांचा निरुत्साह

बँक खाते क्रमांक देण्याचे तहसीलदार दीप्ती देसाई यांचे आवाहन पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दोन- तीन वर्षातील धान पीक नुकसानभरपाईची रक्कम तहसील कार्यालयाद्वारे थेट बाधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी तातडीने त्यांचे बँक खाते क्रमांक आणि सामायिक शेती असल्यास सहमतीपत्र स्थानिक तलाठी अथवा तहसील …

Read More »

नेरळ एसटी स्टॅण्ड रस्त्याची दुरवस्था

वाहनचालक संतप्त; रिक्षा संघटना आंदोलन करणार कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नेरळ स्थानकात पोहचण्यासाठी असलेला रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर केवळ माती शिल्लक उरली असून त्यामुळे धुळीचे लोट रस्त्यावरून चालताना तोंडावर उडत आहेत. नेरळ एसटी स्थानक, सरकारी दवाखाना आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी जाणारा हा रस्ता दुरूस्त करावा …

Read More »

स्वप्नील सोनावणेची शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील मेनन जिमचा शरीरसौष्ठवपटू स्वप्नील सोनावणे याची डायमंड श्री या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी इंडियन फेडरेशन बॉडी बिल्डिंग संघातून 60 किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा औरंगाबाद येथे 16 व 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेकरिता आशिया खंडातील जवळपास सर्व देशांतील खेळाडू …

Read More »

वीर वाजेकर कॉलेजचे अॅेथेलॅटिक्समध्ये सुयश

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन अ‍ॅथेलॅटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही स्पर्धा मरीन लाईन्स येथील क्रीडा संकुलात झाली. फुंडे महाविद्यालयातील अमृता महादेव पाटील या विद्यार्थिनीने हॅप्टेथॅलॉन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. …

Read More »

मयांकचे धडाकेबाज द्विशतक 

दुसर्‍या दिवसअखेर भारत 6 बाद 493 धावा इंदूर : वृत्तसंस्था मयांक अग्रवालच्या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवसअखेर 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 1 बाद 86 या धावसंख्येवरून शुक्रवारी (दि. 15) भारताने डावाला सुरुवात केली होती. …

Read More »

पनवेलमध्ये आठ ग्रामपंचायतसाठी पोटनिवडणुका

पनवेल : बातमीदार तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका 8 डिसेंबर रोजी पार पडत आहेत. त्यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजणी 9 डिसेंबर रोजी आहे. तालुक्यात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या …

Read More »

प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, दोघांना अटक

पनवेल : बातमीदार प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून देणार्‍या दोघांना तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी रंजूबाई व प्रियकर कार्तिक ऊर्फ कौशिक अशी आरोपींची नावे असून दोघांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एस. एम. कन्स्ट्रक्शनचे तळोजा …

Read More »

सॅनिटरी कचर्‍यासाठी प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम

पनवेल : वार्ताहर प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात याचे अ‍ॅम्बेसेडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले आहे. प्रोजेक्टच्या सुरुवातीला दीड लाखापेक्षा जास्त मोफत …

Read More »

पनवेलमध्ये 26 लाखांचे केटामाईन जप्त; एकाला अटक

पनवेल : वार्ताहर केटामाईन पावडर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी पनवेल भागात आलेल्या संभाजी अर्जुन सोनवणे (30) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून तब्बल 26 लाख रुपये किमतीचा 650 ग्रॅम वजनाचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पनवेल भागात एक …

Read More »