Breaking News

Yearly Archives: 2019

विराटकडून बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंजची खूप चर्चा आहे. सर्वसामान्य लोक आणि अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही हे चॅलेंज पूर्ण करीत त्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराटने हातातील बॅटने रिव्हर्स शॉट …

Read More »

तमिळ थलायव्हाजचा गुजरातवर विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था अजय ठाकूर याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर तमिल थलायव्हाजने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सला 34-28 असे पराभूत केले. अजय याने नऊ गुण मिळवले, तर मोहित छिल्लरने शानदार बचाव केला. गुजरातच्या सुनील कुमार याने पाच गुण मिळवले, मात्र तो अखेरच्या क्षणी तमिळ थलैवाजला विजयापासून रोखू शकला …

Read More »

भारतीय तिरंदाजी ; संघटनेवरील बंदी तात्पुरती -महासंघ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्याने निवडणुका घेऊन आचारसंहितेप्रमाणे नवी कार्यकारिणी स्थापन केल्यास या महिन्याच्या अखेरीस भारतीय तिरंदाजी संघटनेवरील बंदी उठवण्याची जागतिक तिरंदाजी महासंघाची इच्छा आहे. महासंघाने बंदी घातल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील निवडणुका होईपर्यंत पाच सदस्यीय हंगामी समिती नेमण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाला दिले आहेत. त्याच्या एक दिवसानंतरच जागतिक महासंघाने ही …

Read More »

आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा : पाकला नमवून भारत अंतिम फेरीत

रंगून : वृत्तसंस्था भारताच्या 23 वर्षांखालील संघाने म्यानमार येथे सुरू असलेल्या आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर 21-25, 25-16, 25-22, 25-18 असा विजय मिळवला. त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. यासह भारताने 23 वर्षांआतील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला …

Read More »

पेण बँक संघर्ष समितीकडून खासदार बारणेंचे आभार

खोपोली ः वार्ताहर बुडीत पेण को. अर्बन बँक आर्थिक घोटाळा व ठेवीदारांच्या थकीत देणीबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देशाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या लोकसभेत दोन वेळा चर्चा घडवून आणली. या चर्चेत संबंधित विभागाच्या मंत्रालयाने सकारात्मक कार्यवाही करून लवकरात लवकवर ठेवीदारांना त्यांची थकीत देणी देण्याचे आश्वासन दिले. खासदार बारणे यांच्या या …

Read More »

जय बजरंग! ; तबिलिसी ग्रांपीत सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रांपीमध्ये सुवर्णपदक पटकाविले, तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रां.पी.मध्ये गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकणार्‍या बजरंग याने पुरुषांच्या फ्री स्टाईल …

Read More »

पनवेलमध्ये मान्सून कप फुटबॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त डी कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानात मान्सून कप फुटबॉल स्पर्धा 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आली आहे. पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने व रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या सहकार्याने होणार्‍या या स्पर्धेत …

Read More »

कर्जतमध्ये भाजपच्या आढावा बैठका सुरू

कर्जत ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी कर्जत मंडळातील कळंब, पिंपळोली, दहिवली, खांडपे, वेणगाव या ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन कर्जत विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खोपोली, खालापूरकर सरसावले

खोपोली ः प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला. तेथील रहिवाशांचे पाण्यात सर्वस्व वाहून गेले. शासनाने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शिळफाटा, बाजारपेठ अशा विविध भागातून मदत फेरी काढण्यात आली. खोपोलीतील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार ते मोठे व्यापारी यांनी भरभरून विविध वस्तूरूपात साहाय्य केले. लायन्स क्लब, रोटरी …

Read More »

रेल्वे प्रशासनाकडून माथेरानमध्ये पाहणी

कर्जत : बातमीदार रेल्वे प्रशासनाच्या अधिकारीवर्गाने अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या वेळी त्यांनी नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे काम येणार्‍या दोन-चार महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच मिनीट्रेनची सेवा सुरळीत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे शटल सेवा सुरू करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला. …

Read More »