कळंबोली : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. सांगली कोल्हापूर शहर पाण्याखालीच गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाताहत झाली आहे. या लोकांना उभारी देताना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कळंबोली भाजपाच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे या पूरग्रस्तांसाठी तांदूळ, पीठ, तेल, …
Read More »Yearly Archives: 2019
नगरसेविका सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तसेच प्रियदर्शनी महिला मंडळ, जिव्हाळा ग्रुप व नगरसेविका सुशीला घरत यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवारी (दि. 13) मदत रवाना केली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेलमधील अस्मिता …
Read More »पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात ; नगरसेविका वृषाली वाघमारे यांचा पुढाकार
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त कोल्हापूर व सांगली येथे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य मिळावे म्हणून नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, जिव्हाळा मित्र मंडळ, तसेच पनवेल महापालिकेच्या नगसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत …
Read More »पोलादपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलादपूर पोलिसांनी केवळ तीन तासात गजाआड केले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गोळयांचीवाडी येथील मनोहर बाबाजी सुर्वे हे शनिवारी सकाळी मुंबई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभे होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोटारसायकलस्वाराने तो …
Read More »कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना 400 ब्लँकेट्स
रोहा : कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना देण्यासाठी 400 ब्लँकेट्स तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन, भरत जैन, मनोज जैन, सतीश जैन, विकी जैन, उज्ज्वल कारेकर, किरण लाडगे, नायब तहसीलदार राजेश थोरे या वेळी उपस्थित होते.
Read More »निवृत्ती माधव महाराज यांना पुरस्कार जाहीर
श्रीवर्धन : प्रतिनिधी नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार शिंपी समाजातील ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज नामदास यांना जाहीर झाला असून, गुरुवारी (दि. 15) सकाळी पनवेलमध्ये होणार्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे. गोवा मुक्तिसंग्रामात तुळशीराम बाळकृष्ण उर्फ हिरवे गुरुजी शहीद झाले. हु. हिरवे …
Read More »कर्जतची सरकारी कार्यालये प्लास्टिकच्या वेष्टनाखाली
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या सर्व इमारतींवर प्लास्टिक आच्छादने टाकावी लागतात. त्यासाठी यावर्षी तब्बल 1800 चौरस मीटर प्लास्टिक कापड आणण्यात आले आहे. कर्जत तहसील कार्यालय परिसरातील सर्व इमारती ब्रिटिशकालीन असून, त्यांच्या छपराला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती …
Read More »खोपोली-पनवेल बसला अपघात
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरून चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एसटी बस ट्रकवर आदळली. विणेगाव (ता. खालापूर) हद्दीत बुधवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या अपघातात बस चालकासह एकूण 15 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस (एमएच-20, बीएल-2232) बुधवारी सकाळी खोपोलीहून पनवेलला जात होती. …
Read More »पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धूमधडाका
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण बुधवारी (दि. 14) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंबेगाव …
Read More »अलिबागेत नारळी पौर्णिमा उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी सन् आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवचा… मनी आनंदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper