Breaking News

Yearly Archives: 2020

उरणच्या चिमुरडीचा विक्रम

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील अवघ्या पावणे सहा वर्षांच्या हर्षिती भोईर या चिमुरडीने ट्रेकिंगमध्ये विक्रम केला आहे. या बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षिती भोईर हीने साडेतीन वर्षांची असल्यापासून ट्रेकची आवड जोपासली आहे. फक्त साडेपाच वर्षात तिने दोन रेकॉर्डची नोंद करून आपले आणि आपल्या गावाचे नाव पूर्ण …

Read More »

जासई हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व विद्यालयातील शिक्षक वर्ग सोशल डिस्टन्सिंग …

Read More »

झाड कोसळून कारचे नुकसान

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ शिरवणे गावात जाणार्‍या रस्त्यावर झाड कोसळल्याने कारचा चुराडा झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली. राजीव गांधी ब्रिजजवळून शिरवणे गावात शिरताच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असतात. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात काही झाडे पडली होती तर काही …

Read More »

नवी मुंबईतील रस्त्यांवर रेतीच रेती

दुचाकीचे अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना सध्या पावसाने वाहून आलेल्या रेतींचे प्रमाण दिसू लागले आहे. नवी मुंबईतील अनेक महत्वाच्या शहरांतर्गत रस्त्यांवर रेती पसरलेली आहे. नियमित या मार्गांवरून प्रवास करणार्‍या नागरिकांना चटकन या रेतीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत. या …

Read More »

भाजपतर्फे जासई विद्यालयात गरजूंना अन्नधान्याचे वाटप

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 9) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 500 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन …

Read More »

लॉकडाऊन शिथिलतेनंतर चोरट्यांची टोळी सक्रिय

आठ दिवसांत 20पेक्षा जास्त गुन्हे पनवेल : बातमीदार टाळेबंदी 1 सप्टेंबरपासून शिथिल केल्यानंतर चोर्‍या करणारी टोळी सक्रिय झाली असून नागरिकांनी सोनसाखळी, मंगळसूत्र आणि मोबाइल या मौल्यवान वस्तूंचा वापर सावधानतेने करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  केवळ आठ दिवसांत …

Read More »

सरकारची लक्तरे

कोरोना महामारीचे निमित्त करून कसेबसे उरकलेले दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात दीर्घकाळ राहील ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धारदार भाषणामुळेच, अन्यथा पुरवणी मागण्यांसाठी बोलावलेले हे अधिवेशन म्हणजे पितृपक्षातील चटावरचे श्राद्धच म्हणावे लागेल. विधिमंडळ अधिवेशनात तब्बल 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव सभागृहात ठेवल्यानंतर त्यावर फारशी चर्चाच होऊ …

Read More »

रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 776 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 8) 17 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि तब्बल 776 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 516 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील  नऊ, उरण, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि खालापूर व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले …

Read More »

कडावमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण; पोलिसांत तक्रार दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कडाव येथील शेतकर्‍यांच्या खुराड्यात असलेल्या गावठी कोंबड्या गायब होत आहेत. याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कोंबडीचोरांना पकडण्याची मागणी केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात, पण अशाच प्रकारे शेतीला पूरक जोडधंदा करणारे कडाव येथील शेतकरी व …

Read More »

भाजपतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा …

Read More »