नवी दिल्ली ः आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायुगळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. येथे एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. विषारी वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना …
Read More »Yearly Archives: 2020
भारत जगाच्या पाठीशी उभा : पंतप्रधान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्यस्थितीत त्यास परवानगी नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करीत आहे. या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे …
Read More »‘लॉकडाऊन’ असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी
कर्जत भाजप महिला मोर्चाची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मद्यविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून लॉकडाऊन लागू असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने …
Read More »दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी – दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे (53) यांचे दीर्घ आजाराने माहीम येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे. दूरदर्शनच्या वृत्त विभागात 1991 ते 2001 दरम्यान त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून काम केले होते. गेल्या 11 महिन्यांपासून मालविका मेंदूच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. गुरुवारी दुपारी …
Read More »रायगडातून 66 हजार लोकांचे परराज्यात जाण्यासाठी अर्ज
औद्योगिक प्रकल्पांमध्ये निर्माण होणार मनुष्यबळाची समस्या अलिबाग : प्रतिनिधी – परराज्यात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 66 हजार लोकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. काही राज्यातील लोक परत जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त – गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल-उरण पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, …
Read More »मुंबई एपीएमसी तातडीने बंद करावी
आमदार गणेश नाईक यांची मागणी नेरुळ : बातमीदार – नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत सर्वच मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची वाढ सातत्याने होत असल्याने हे मार्केटच बंद करावे, अशी मागणी ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांना पत्र देऊन केली आहे. नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून …
Read More »राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ; समन्वयाचा अभाव
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह मुंबई : प्रतिनिधी – राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 7) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ आणि समन्वयाचा अभाव असल्याची टीका फडणवीस यांनी …
Read More »गरज कोरोना योद्ध्यांची
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून स्वत:चे खाजगी दवाखाने, नर्सिंग होम्स बंद ठेवून घरी बसलेल्या मुंबईतील खाजगी डॉक्टरांना किमान 15 दिवस कोविड-19चे रुग्ण असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंधनकारक करणारा आदेश वैद्यकीय शिक्षण-संशोधन संचालनालयाने काढला आहे. कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत गेल्यास सर्वच रेड झोनमध्ये हे पाऊल उचलणे भाग पडू शकेल. असंख्य देश …
Read More »विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रसायनीनजीकच्या कसळखंड येथील धन्वंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पध्दतीने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आला. या वळी विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांच्या हस्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper