Breaking News

Yearly Archives: 2020

मुरूडमधील पेट्रोल पंपांवर उसळली वाहनांची गर्दी

गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यात असलेल्या विहूर व शिघ्रे येथील पेट्रोल पंपावर मालकांनी सर्वसामान्य नागरिकांना मागेल तेवढे पेट्रोल दिल्याने शनिवारी (दि. 2) या दोन्ही पंपांवर मोठी गर्दी गर्दी जमली होती. दुचाकी वाहनांच्या रांगा दूरवर पसरून सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला गेला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे …

Read More »

‘आयएफएसी म्हणजे आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा प्रकार’

मुंबई : प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) आजही मुंबईत शक्य आहे आणि आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला, पण आज जे गळे काढून ओरडत आहेत त्यांनी 2007 ते 2014 या काळात काय केले याचे उत्तर आधी दिले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात दोन पॉझिटीव्ह रुग्ण शनिवारी (दि. 2) आढळल्याने तालुक्यात   कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. आजच्या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटीव्ह झालेल्यांच्या घरातील सात रुग्णांचा समावेश आहे. गोवंडी येथील यूएसव्ही  फार्मा कंपनीतील कामगार किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीही यात आहेत. पनवेल …

Read More »

नागोठणे येथे फेस शिल्डचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी – नागोठणे येथील सुभाष ओटरमल जैन यांनी कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणाची बाजी लावून काम करणारी पोलीस यंत्रणा तसेच आरोग्य पथक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना फेस शिल्डचे वाटप करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.  जैन यांनी साहित्याचा संच पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून …

Read More »

परराज्यात जाण्याची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयांबाहेर गर्दी

अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले जे नागरिक आपल्या राज्यात परत जाऊ इच्छितात त्यांची माहिती जमा केली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात परराज्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. आपली माहिती देण्याकरिता तहसील कार्यालयांत हे नागरिक गर्दी करू लागले आहेत. राज्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी …

Read More »

विदेशी दारू विक्री करणारा अटकेत

नवी मुंबई पोलिसांची कारवाई उरण : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर – जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत असतांना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई ऐरोली येथे विदेशी दारू विक्रीसाठी आलेल्या इसमास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रंगेहात पकडून मुद्देमुलासह अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून …

Read More »

वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

परराज्यात जाण्यासाठी एकच गर्दी नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच अफवेच्या पिकांना देखील उत आलेला आहे. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 2) नवी मुंबईत आला नि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. परराज्यात जाण्यासाठी नवी मुंबई …

Read More »

सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक खारघर विभाग जितेंद्र मढवी यांच्या सोबत शनिवारी (दि. 2) सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात एक आढावा बैठक घेतली.  दिवसेंदिवस खारघरमधील …

Read More »

खांदा कॉलनीतील कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी -गणेश पाटील

कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी वसाहतीतील नाले, गटारे सफाई, रस्त्यांची डागडुगी तसेच फुटपाथची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. ही सर्व कामे प्रकल्पग्रस्त करत आले आहेत पण यावर्षी कोरोना महामारीचा फायदा उठवत सिडको अधिकार्‍यांनी त्यांच्यावर अन्याय केला …

Read More »

तीन महिन्यांचा मालमत्ता, पाणी कर माफ करा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता व पाणी कर माफ करावा, …

Read More »