Breaking News

Yearly Archives: 2020

पनवेल : भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, भाजप नेते राजू बनकर आदी उपस्थित होते.

Read More »

उलवे नोड येथे पोंगल सण जल्लोषात, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे तमीळ संगम व दिनकर यांच्या वतीने ‘पोंगल फेस्टिव्हल’चे उलवा नोड येथे बुधवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा सोहळा उलवे नोड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित …

Read More »

उरणच्या फुंडे हायस्कूलमध्ये मकरसंक्रांतीचा सण उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे बुधवारी (दि. 15) मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘सण संक्रांतीचा मोठा, नाही आनंदाला तोटा,’ असा हा आनंददायी उत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ‘अ’च्या वर्गाने हा कार्यक्रम सादर केला. सकाळी शालेय परिपाठानंतर विद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

महिलांसाठी आज हेल्मेट बाइक रॅली

पनवेल : कलंबोळी वाहतूक शाखा येथे सर्व महिलांसाठी हेल्मेट बाइक रॅलीचे आयोजन गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. अधिकाधिक महिलांनी बाइक रॅलीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन कळंबोली वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी केले आहे. तसेच सहभागी महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी …

Read More »

ट्रकचोरट्यास अटक

पनवेल ः 13 लाख रुपये किमतीचा ट्रक चोरणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा ट्रक हस्तगत केला आहे. पनवेलजवळील भारत ढाब्यासमोर कान्होबा ढाब्याजवळ जेएनपीटी रोडलगत अशोक लेलॅण्ड कंपनीचा 12 टायर असलेला ट्रक क्र.एमएच-46-एएफ-2167 हा उभा करून …

Read More »

‘कळंबोली येथील सिडको वसाहतींना पायाभूत सुविधा द्या’

पनवेल : बातमीदार 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या कळंबोलीतील सिडकोच्या वसाहतीतील पायाभूत सुविधा जीर्ण झाल्या आहेत. कंडोनियमच्या आवारातील रस्ते, गटारे, पदपथ मोडकळीस आले आहेत. त्यामुळे सिडकोकडून या मूलभूत सोयीसुविधांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली. कळंबोलीतील नागरिक प्रशांत ननावरे यांनी ही मागणी केली. कळंबोली वसाहतीत सिडकोने 30 वर्षांपूर्वी अत्यल्प उत्पन्न …

Read More »

जेएनपीटी आणि नॉर्वे यांची परस्पर सहकार्याच्या संधीसंदर्भात चर्चा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर नॉर्वे येथील कन्स्युल जनरल सुश्री ऍन ऑलस्टेड यांनी भारतातील महत्त्वपूर्ण कंटेनर पोर्ट म्हणून महती प्राप्त झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला भेट देऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि पोर्ट ऑफ ओस्लोमध्ये परस्पर सहकार्य आणि दीर्घकालीन विकासाबाबतच्या संधींवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये नेहमीच सबळ आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. …

Read More »

‘ती’ मुलगी देहरादूनमध्ये सापडली

पनवेल : प्रतिनिधी तळोजा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप करून बेपत्ता झालेली खारघरमधील अल्पवयीन मुलगी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाली होती. ती मुलगी आपल्या मित्राबरोबर देहरादून येथे सापडली असून तिच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे.  पीडित मुलीच्या वाढदिवसावेळी …

Read More »

दैनिक बित्तंबातमीचा प्रकाशन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त दैनिक बित्तंबातमी रायगड आवृत्तीचा प्रकाश समारंभ शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजता पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दैनिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख उपस्थिती आमदार …

Read More »

कर्जतमध्ये नॅपकीन, डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन

कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेने सॅनिटरी नॅपकीन व डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन बसवली आहे. संपूर्ण कोकणात फक्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिले अडीच कोटी रुपयांचे अनुदान घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि …

Read More »