Breaking News

Monthly Archives: June 2022

जातीय तेढ निर्माण करणार्‍यावर कारवाई करावी; कर्जत शहर आरपीआयची मागणी

कर्जत : बातमीदार कार्ला येथील गडावर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भात खालापूर तालुक्यातील वयाळ गावातील समीर पवार या तरुणाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी कर्जत शहर आरपीआयने (आठवले गट) पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरपीआयच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे …

Read More »

पुणे-माणगाव-दिघी महामार्गाला लागलेय केबल खोदाईचे ग्रहण

शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष म्हसळा : प्रतिनिधी पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गाच्या  म्हसळ्यापासून माणगावपर्यंतच्या टप्प्यालगत केबलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असून, त्यामुळे पावसाळ्यांत या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढण्याचा शक्यता आहे. केबलसाठी खड्डे खणणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा योध्दा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी केली आहे. पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय …

Read More »

महावितरणच्या कॉईल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

नऊ जण गजाआड, 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील कॉपर आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या तारा चोरणार्‍या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊजणांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. …

Read More »

भविष्य निर्वाह निधी पथकातील तिघांना लाच घेताना पकडले

अलिबाग : प्रतिनिधी भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) रायगड कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांना तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने रंगेहाथ पकडून अटक केली. सहाय्यक लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र रामचंद्र गायकवाड, कनिष्ठ लिपिक  रुपेश सुभाष देशमुख अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत. भविष्य निर्वाह …

Read More »