अन्यथा उपोषण करणार, हरिदास बाणकोटकर यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी शासनाने बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारी करणार्या मच्छिमारांवर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरूड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे शासनाने 1 जून ते 31 जुलै …
Read More »Monthly Archives: June 2022
कर्जत तालुक्यातील नऊ गावे पूरग्रस्त, तीन गावे दरडग्रस्त
आपत्ती आराखडा तयार, प्रशासनाकडून नियोजन कर्जत : बातमीदार पुर्वानुभवानुसार नऊ गावे पूरग्रस्त आणि तीन गावे दरडग्रस्त आहेत, असे गृहीत धरून कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासनाने संभाव्य आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे. कर्जत तालुक्यात दरवर्षी सुमारे 3500 मिलीमीटर पाऊस होत असतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात …
Read More »भाजपच्या प्रयत्नांनी मैदान परिसरात बसविला हायमास्ट
नवी मुंबई : प्रतिनिधी सिवूड प्रभाग 41 येथील सेक्टर 46 मध्ये साईकृपा सोसायटीसमोर असलेले धर्मवीर संभाजीराजे खेळाचे मैदान या ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला आहे. याकामी भाजपचे दत्ता घंगाळे यांनी नागरिकांच्या मागणीवरून नवी मुंबई मनपाकडे पाठपुरावा केला होता. धर्मवीर संभाजीराजे खेळाचे मैदान या ठिकाणी हायमास्ट बसविण्याची घंगाळे यांनी नागरिकांच्या मागणीवरून नवी …
Read More »अविनाश कोळी यांचे पत्रकार मंचाकडून अभिनंदन
पनवेल : वार्ताहर येथील सुप्रसिद्ध अशा केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्ष अमित ओझे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सदस्य अविनाश कोळी यांची पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अविनाश …
Read More »जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 1000 बुध्दा बेली बांबूची वृक्षलागवड
नवी मुंबई : बातमीदार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील परिसरात गणपतशेठ तांडेल मैदानाच्या बाजूला बुध्दा बेली बांबूच्या 1000 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणात लोकसहभाग हे सूत्र नजरेसमोर ठेवून या वृक्षारोपणामध्ये सायकल क्लब ऑफ इंडिया या पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या 185 सदस्यांनी उत्साहाने …
Read More »नवी मुंबईत व्यसनमुक्ती जनजागृती महापालिका मुख्यालयात उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 31 मे रोजीचा जागतिक तंबाखू सेवन वर्ज्य दिन तसेच 5 जून रोजीचा जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तंबाखूच्या व्यसनाने पर्यावरणावर होणारे परिणाम या विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रम …
Read More »पोलादपूरच्या पतसंस्थेचा चौकशी अहवाल बासनात!
पोलादपूर तालुक्यात अनेक नॉन बँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीदेखील ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था आणि नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार आणि अल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्थांच्या संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी ठेवी-पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहोचलाच नाही. परिणामी हजारो …
Read More »संकटकाळातली कामगिरी
कोविड महासाथीच्या संकटकाळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली. कोविडची तिसरी लाट, अपुरे राहिलेले अभ्यासक्रम, बहुतांशी ऑनलाइन पार पडलेले शिक्षण, त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष शाळा-कॉलेजातील शिक्षणाशी जुळवून घेणे या सार्यातून विद्यार्थ्यांची भीषण दमछाक झाली होती. मुंबईमध्ये कोविडसंबंधी परिस्थिती अधिकच बिकट होती. ती सावरायला सर्वाधिक वेळही लागला. त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात …
Read More »मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजमध्ये झररीन फातिमा शेख प्रथम
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 97.97 टक्के लागला असून शेख झररीन फातिमा शेख चांद हिने 88.33 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. हादीया अन्वर चिलवान आणि अफनान आदम राऊत (87.33 टक्के) यांनी द्वितीय तर अवेस जमालुद्दीन राऊत (85 टक्के) …
Read More »मुरूडच्या अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये मनाल उलडे आणि सुबिया कलाब प्रथम
मुरूड : प्रतिनिधी येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या विज्ञान शाखेचा निकाल 90.67 टक्के तर कला शाखेचा निकाल 73.68टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचे 117 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 106 विद्यार्थी पास झाले. त्यात मनाल हिफाजान उलडे (77.83 टक्के) हिने प्रथम, सहिमा ए. सलाम मुकादम (77.67टक्के) हिने व्दितीय आणि महेक सुहेल गोलंदाज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper