जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन अलिबाग : प्रतिनिधी ढिसाळ व्यवस्थापन, चुकीची धोरणे, व्याजदर ठरवण्यातील समस्या, मार्केटींगकडे दुर्लक्ष यामुळे सहकारी बँका व पतसंस्था अडचणीत येतात, असे मत रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे नवीन कार्यालय घेण्यात आले …
Read More »Monthly Archives: July 2022
उसर्ली खुर्द माजी सरपंचांपासून धोका
मच्छिंद्र पाटील यांची पोलीस संरक्षणाची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत यांनी बनावट बांधकाम परवाना देऊन पदाचा गैरवापर केला. याबाबत मच्छिंद्र आत्माराम पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा मनात राग धरून विश्वास भगत यांच्यापासून मला …
Read More »द्रुतगती मार्गावर खोल दरीत कार कोसळली; तीन जण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी इरटीका कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इरटीका कार (टीएस 08,जीएन-1219) द्रुतगती …
Read More »म्हसळा तालुक्यात संततधार
आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस …
Read More »भिवपुरी रोड रेल्वेस्थानक परिसरात पाणीच पाणी!
प्रवाशांची तारेवरची कसरत कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्या वेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनविला नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 8) सकाळपासून भिवपुरी रोड …
Read More »माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय
कर्जत : बातमीदार माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून शहरातील संभाव्य अडचणी दूर करण्यास सुरूवात झाली आहे. रस्त्यावर कोसळलेली झाडे, रस्त्यावरील निघालेले पेव्हर ब्लॉक, शेवाळामुळे निसरडे झालेले रस्ते, उघडे वीजरोहित्र आणि शार्लोट लेकची सुरक्षितता याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. माथेरान परिसरात दरवर्षी सरासरी पाच हजार मिली पाऊस पडत असतो. चार महिने …
Read More »खोपोलीत आपत्कालीन मदतीसाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांचा पुढाकार
यशवंती हायकर्स, अपघातग्रस्त, सर्पमित्रांची घेतली बैठक खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक अनुप दुरे यांनी सतर्कता दाखवत पालिकेची आपत्कालीन टिम तयार केली आहे. दगरडग्रस्त भागातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी शाळांंमध्ये व्यवस्था ठेवली आहे. तर अतिवृष्टीत मानवहानी आणि वित्तहानी होवू नये यासाठीची खबरदारी घेत …
Read More »नेरळ-माथेरान घाटरस्ता अपघातमुक्त करावा
टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या एका बाजूने आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र ती गटारे दगडांनी भरली असून पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. दरम्यान, माथेरान घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दगडी धोकादायक अवस्थेत असून त्या दगडांना बाजूला करून घाटरस्ता अपघातमुक्त …
Read More »पाताळगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पाणी खालापूर : प्रतिनिधी खोपोली, खालापूर, रसायनी परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाचे घुमशान सुरू आहे. खालापूर तालुक्याची वरदायिनी असणारी पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खोपोलीत बीएसएनएल कार्यालयालगत उभारण्यात येत असलेल्या महाकाय गृहसंकुल परिसरात केलेला मातीचा भराव व बांधकामामुळे पावसाचे पाणी अडल्याने …
Read More »कर्जतमधील तीन घरांमध्ये घुसले पाणी
कर्जत : बातमीदार शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमसान सुरू आहे. शहरातील भगवान टॉकीज भागात पावसाचे तुंबलेले पाणी तीन घरांत घुसले. त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान झाले. मात्र कर्जत नगरपालिकेने तात्काळ पावले उचलत साचून राहिलेले पाणी जाण्यासाठी मार्ग काढला आणि नागरिकांनी दिलासा दिला. कर्जत शहरात मागील तीन दिवस पावसाची संततधार सुरु …
Read More »