Breaking News

Monthly Archives: November 2022

नवी मुंबइतील सार्वजनिक वाहतूकीचे कौतुक

प्रथम पुरस्काराने शहराचा गौरव नवी मुंबई : बातमीदार भारत सरकारच्या  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ आरंबन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत कोची येथे झालेल्या 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर ’ श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले. …

Read More »

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगडातील खेळाडू चमकले

उरण : बातमीदारी दिल्ली येथे नुकतीच दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पनवेल, पेण व माणगाव तालुक्यातील चार खेळाडूंनी सहभाग घेत पदके जिंकली स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रितिका सिंग, टेक्निकल कमिटी वाको चेअरमन रोमिओ देसा (क्रॉटिया), रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको चेअरमन युरी लक्टिकोव (इस्टोनिया) यांच्या …

Read More »

रोह्यात जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत किहीम संघ विजयी

धाटाव : प्रतिनिधी रोह्यामध्ये जय नागोबा ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धचे सोमवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेत किहीम संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेवेळी रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, आयोजक घनश्याम कराळे, जय नागोबा ग्रुपचे प्रवीण जैन, राकेश जैन, विक्रम जैन …

Read More »

बुधवारी न्यूझीलंड-पाकिस्तान पहिली सेमीफायनल

सिडनी : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमधील पहिल्या सामन्यात पहिल्या गटातील अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या गटामध्ये दुसर्‍या स्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सिडनीच्या मैदानावर बुधवारी (दि. 9) हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना खेळवला जाईल. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी किंवा अंतिम …

Read More »

विश्वचषक दोन पावलांवर…

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी 2007मध्ये याच झटपट प्रकारातील पहिल्यावहिल्या चषकावर टीम इंडियाने आपले नाव कोरले होते. पाठोपाठ 2011मध्ये एकदिवसीय करंडक दुसर्‍यांदा जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. त्यानंतर एक तपाचा कालावधी …

Read More »

सुधागडात भातकापणी व झोडणीच्या कामांना वेग

पाली ः प्रतिनिधी पाली-सुधागडात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसानंतर उरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य कामाला लागली आहेत. यामध्ये तरुणदेखील आहेत.    नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. वकाळी पाऊस व …

Read More »

कर्जतचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाची गंगा आणली आहे. कर्जतचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काम करणार्‍यांवरच टीका होते. ती झालीही पाहिजे कारण त्यामधूनच आपण आपल्या चुका दुरूस्त करून पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर …

Read More »

करोटी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत पेण ः प्रतिनिधी अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन

सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण अलिबाग ः प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे …

Read More »

गुरू नानक जयंतीनिमित्त कळंबोलीत विशाल नगर कीर्तन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त बंधू भाव, एकात्मता सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 533वी जयंत्ती मंगळवारी (दि. 8) आहे. त्यानिमित्त रविवारी कळंबोली गुरुद्वाराच्या वतीने विशाल नगर किर्तनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …

Read More »