Breaking News

Monthly Archives: November 2022

हॉलीबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मांडवखार संघ विजेता

खारेपाट : वार्ताहर रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे कोएसो हायस्कूल माणकुले येथील पटांगणात जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेत जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत मुरूड, पेण, पाली, अलिबाग, खालापूर, पनवेल तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक मॉडेल संघ रांजणखार, तृतीय बोर्ली मांडला संघ, …

Read More »

रायगड जिल्ह्यातील आर्यन पाटीलला उंच उडीत ‘सुवर्ण’

माणगाव : प्रतिनिधी आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या 37व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये उंंच उडी खेळात रायगड जिल्ह्यातील आर्यन अरुण पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत आर्यनने रौप्यपदक जिंकले होते. आर्यनला केंद्र शासनातर्फे पाच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. आर्यन पाटीलचे वडील अरुण पाटील …

Read More »

डायबिटीज जनजागृती मॅरेथॉनला पनवेलमध्ये प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः वार्ताहर समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॅरेथॉन रविवारी (दि. 13) नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘गेल’विरोधात आंदोलन 

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अलिबागमध्ये इशारा रेवदंडा ः प्रतिनिधी गेल इंडिया कंपनीकडे उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहेत. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. ते रविवारी (दि. …

Read More »

आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यात कारवाई; दोन आरोपी जेरबंद पनवेल ः वार्ताहर ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी दोन हजार रुपये चलनी दराच्या तब्बल आठ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा-5कडून ही कारवाई करण्यात आली. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख …

Read More »

महिला लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवित आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणीने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा हिचा शनिवारी (दि. 12) सत्कार …

Read More »

करंजाडेतील शेकापला गळती सुरूच; कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडीतील शेकाप कार्यकर्ते असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 12) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

अलिबागच्या लाचखोर तहसीलदारांकडे आढळले घबाड; झडती सुरूच

अलिबाग ः प्रतिनिधी लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील टेंभोडे येथे ओपन जिम

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असून नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्या अंतर्गत टेंभोडे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे …

Read More »

खेरणे ग्रामपंचायतीत भाजपचे पर्व

सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी स्वीकारला पदभार पनवेल ः रामप्रहर वृत्त खेरणे ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम होते. ते मोडीत काढत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विराजमान झाले आहेत. सरपंच शैलेश माळी आणि उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »