Breaking News

Monthly Archives: November 2022

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची माणगावच्या निकम स्कूलला सदिच्छा भेट

माणगाव : प्रतिनिधी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी  नुकताच माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर सायन्स कॉलेजला सदिच्छा भेट दिली. माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. एस. निकम यांनी पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, परंतु सुसंस्कृत नाही.आज मला सर्वात चांगली …

Read More »

जनकल्याण समितीतर्फे आदिवासी वाड्यांवर भाऊबीज ओवाळणी

म्हसळा : प्रातिनिधी दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या रोहा शाखेतर्फे शनिवारी (दि. 29) मुरूड तालुक्यातील वाळवटी आदिवासीवाडीमध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी 33 आदिवासी महिलांना नविन साड्यांचे वाटप करण्यात आले. जनकल्याण समितीची पुर्वा पाळंदे हिने कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ संघ कार्यकर्ते अविनाश दाते यांनी सांघिक गीत म्हटले. …

Read More »

विहूरमधील विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील किमान शंभर विद्यार्थी रोज नांदगाव हायस्कूलमध्ये जातात. मात्र बस उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेच्या वेळेत पोचता येत नव्हते. मुरूड आगाराने रोज सकाळी 9.30 वाजता मुरूड-नांदगाव बस सुरू केली आहे. या गाडीचा विहूर, मोरे परिसरातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विहूर ग्रामपंचायत …

Read More »

मन प्रसन्न असेल तर सर्व काही प्राप्त करू शकता -प्रल्हाद वामनराव पै

कर्जत : प्रतिनिधी मन हे जीवनाचे केंद्र आहे. मन प्रसन्न झालं की तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकता. मन म्हणजेच जाणिव जेव्हा तुम्हाला नियंत्रित करते, तेव्हा तुमचं जीवन भरकटत जातं मात्र जेव्हा आपण जाणिवेला नियंत्रित ठेवतो तेव्हा भरभराट होते, असे मौलिक मार्गदर्शन  जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी …

Read More »

म्हसळा तालुक्यात विंचू, सर्पदंशांच्या घटनांमध्ये वाढ

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात विंचू, सर्प दंशांच्या घटनांत वाढ झाली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत म्हसळा तालुक्यात विंचू,सर्प आणि अन्य दंशांच्या 159 घटनांची नोंद झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सागर काटे यांनी दिली. म्हसळा ग्रामिण रुग्णालयात सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत विंचू, सर्प आणि …

Read More »

गुरेचोरांवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन!

नऊगाव आगरी समाज संघटनेचे मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी गुरे चोरून त्यांची कत्तल करणार्‍यांचा त्वरीत शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या गुरांची चोरी झाली आहे त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नऊगाव आगरी समाज संघटनेने मुरूड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.  …

Read More »

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघ असल्याची अफवा

वनविभागाकडून माध्यमांतील वृत्ताचे खंडण; व्हायरल व्हिडीओमधील दृष्ये खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर झळकले. तसेच विविध बातम्यांमधून वाघ दिसला असल्याच्या शक्यता मंगळवारी (दि. 1) वर्तवण्यात आल्या होत्या, मात्र खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त खोट असल्याचे एका वन अधिकार्‍याने सांगितले आहे. खारघरच्या डोंगरांमध्ये …

Read More »

महिला आणि दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप : बांधपाडा ग्रामपंचायतीचा उपक्रम

उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या 15वा वित्त आयोग व महिला बालकल्याण-दिव्यांग सेस निधीतून 62 दिव्यांगांना सोलर यूपीएस मशीनसह तीन एलईडी बल्प तसेच 50 महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर आणि उपसरपंच सुजित …

Read More »

खांदा कॉलनीतील सोसायट्यांच्या दिशादर्शक नामफलकाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 7 येथे सोसायट्यांच्या दिशादर्शक नाम फलकाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजप खांदा कॉलनी अध्यक्ष व माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

पनवेलमध्ये पथविक्रेत्यांची पहिली यादी जाहीर

मनपा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत 3076 जणांना मान्यता पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार फेरीवाला धोरणांतर्गत पनवेल महापालिका शहर फेरीवाला समितीची बैठक मंगळवारी (दि. 1) झाली. या वेळी सर्वानुमते 3076 पथविक्रेत्यांची पहिली यादी अंतिम करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय …

Read More »