पनवेल : वार्ताहर कामोठ्यातील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग …
Read More »Monthly Archives: November 2022
पनवेलमधील साई वर्ल्ड सिटी प्रकल्प पूर्ण
मान्यवरांच्या उपस्थितीत 800 रहिवाशांना चावी सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभाला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व लोकनेते रामशेठ ठाकुर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) उपस्थित राहून पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा …
Read More »रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र कमी होतेय!
विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …
Read More »कल्याणकारी कौल
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …
Read More »माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा
माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …
Read More »वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे
सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …
Read More »मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना …
Read More »ज्या जनतेने आमदार केले त्यांच्याशी प्रामाणिक
आमदार शहाजीबापू पाटील यांचे रेवदंड्यात प्रतिपादन रेवदंडा ः प्रतिनिधी ज्या जनतेने आमदार केले, त्यांच्याशी प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी उपस्थितांना संबोधिताना केले. रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात …
Read More »खारघरच्या खाडी किनार्यांवर पक्ष्यांची रेलचेल
पनवेल : वार्ताहर थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनार्यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. किनार्यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनार्यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे. निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या …
Read More »नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी
घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील …
Read More »