पनवेलमध्ये नवीन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके विमुक्त आघाडीच्या (भविआ) संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. 11) झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान …
Read More »Yearly Archives: 2022
टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने दुहेरीत जिंकले सुवर्णपदक
पंचकुला : वृत्तसंस्था खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि दिया चितळे या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी 14-12, 11-09, 11-6 असे तीन सेट जिंकून ही ‘सुवर्ण’ कामगिरी केली. पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहणार्या स्वस्तिकाने लहानपणापासून …
Read More »श्रीवर्धनमध्ये तब्बल 36 तास वीजपुरवठा खंडित
स्थानिकांसह पर्यटकही त्रस्त श्रीवर्धन : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे श्रीवर्धनसह हरिहरेश्वरमधील वीजपुरवठा तब्बल 36 तास खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले. श्रीवर्धन शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या वेळी पाभरे वीज उपकेंद्रातून श्रीवर्धनकडे येणार्या मुख्य विद्युत वाहिनीवर विजेचे झोत पडल्यामुळे संपूर्ण म्हसळा ते …
Read More »खारघरमध्ये रक्तदान, आरोग्य शिबिराला प्रतिसाद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 12) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा
राज्यसभा निवडणुकीनंतर ना. नारायण राणे आक्रमक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली …
Read More »तळोजा एमआयडीसीत पाणीटंचाई
उद्योगांना फटका; उद्योग राज्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याची टीआयएची अपेक्षा पनवेल : वार्ताहर नागरी वसाहती प्रमाणे तळोजा एमआयडीसीमध्येही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने आता कारखानदारांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे खर्च होत आहे. त्याचबरोबर उद्योग आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यासंदर्भात तळोजा इंडस्ट्रीज …
Read More »नवी मुंबईत हॅपी स्ट्रीट उत्साहात
शिवराज्याभिषेक ठरला आकर्षक नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, हॅपी स्ट्रीट सारखे पहाटे तसेच नयनरम्य वातावरणात होणारे कायर्क्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »नवी मुंबईतील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील सेक्टर 17 मध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी भीषण दुर्घटना घडली. जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील 6 व्या मजल्यापासून सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात एक 29 वर्षीय तरूण ठार तर सात रहिवाशी गंभीर जखमी झाले. आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील …
Read More »भाजपच्या विजयाचा पनवेलमध्ये आनंदोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. याबद्दल भाजपच्या पनवेल शहर व तालुका मध्यवर्ती कार्यालयापाशी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 11) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पीयुष गोयल, डॉ. अनिल …
Read More »उलवे नोडमधील सोनाराला सव्वा लाखाचा गंडा
पनवेल : वार्ताहर सोनाराला बनावट चेन विकून एक लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उलवे नोड मध्ये घडली आहे. उलवे सेक्टर 20 येथील सागर ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. कामगार अरुणकुमार जोशी हा ज्वेलर्समध्ये असताना एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आली होती. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याकडील सोन्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper