Breaking News

Yearly Archives: 2022

माथेरानमध्ये ई-वाहनांची चाचणी घेण्याचे पालिकेला आदेश

कर्जत : बातमीदार माथेरान सनियंत्रण समितीने परवानगी दिल्यानंतर सर्वोच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडून ई-रिक्षाची चाचणी घेईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने माथेरान पालिकेला पत्र पाठवून ई रिक्षाची चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ई-वाहनांची चाचणी घेण्यात येणार असल्याने माथेरानकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना …

Read More »

हर घर दस्तक 2ची पनवेल महापालिका क्षेत्रात सुरुवात

चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर लसीकरणाचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी हर घर दस्तक 2मोहिमेची सुरुवात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही मोहीम 1 जून ते 31 जुलैदरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. …

Read More »

“सर्वांच्या सोबतीने अनेक कामे मार्गी”

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गव्हाण येथे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांना सोबत घेऊन अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) गव्हाण येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय गव्हाण येथे नव्याने बांधण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी …

Read More »

‘रयत’च्या सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा धनादेश

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या ढवळी येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश रयतचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी सोबत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत एन. डी. पाटील यांचे नातू सागर पाटील यांच्या नावाने ही शाळा …

Read More »

शिवछत्रपतींच्या जयघोषाने किल्ले रायगड दुमदुमला

राज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात अलिबाग : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सोमवारी (दि. 6) किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात झाला. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळयाला मंत्रोच्चारांच्या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये  महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली. हे वृक्षारोपण संस्थेचे सचिव …

Read More »

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

कामोठ्यात स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आठवे पुण्यस्मरण रविवारी (दि. 5) कामोठे येथे झाले. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जय गोपीनाथ प्रतिष्ठान …

Read More »

चोरीच्या 25 सायकली हस्तगत

सराईत चोरटा पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या सायकली चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय …

Read More »

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे गरजेचे

ना. रामदास आठवले यांचे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून …

Read More »

राजिप सीईओ डॉ. किरण पाटील आणि गव्हाण ग्रामपंचायतीचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण …

Read More »