रसायनी : रामप्रहर वृत्तदुर्गम भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असून नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमच्यासाठी विकासकामांची मोठी संधी आहे. या संधीचे आम्ही निश्चितच सोने करू, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.पनवेल तालुक्यातील आपटा येथील दुर्गम अशा घेरावाडीमध्ये …
Read More »Monthly Archives: April 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तशरीर आणि मन दोन्ही सुदृढ होण्यासाठी खेळाची नितांत गरज असून कुस्ती हा खेळ या दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम करतो. त्यामुळे नितळस येथे सुरू झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुल हे तरुणांच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »उलवे नोड येथील महोत्सवाचा शानदार समारोप
मंत्री आशिष शेलार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव उलवे नोड : रामप्रहर वृत्तमला सर्वात आवडलेलं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या भाषणातील एक वाक्य आहे ते म्हणजे आम्हाला आंदोलनाची सवयच आहे. तुमचा जसा आंदोलनाचा पिंड आहे तोच आमचाही आहे, पण मंत्री झाल्यापासून जरा त्या भूमिकेला आवर घालावा लागतोय, मात्र तुम्हाला …
Read More »महाराष्ट्रात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा
पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पनवेल महापालिकेने स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम या अत्याधुनिक स्व-सेवा सुविधेचा शुभारंभ केला आहे. या स्मार्ट किऑस्क मशीनचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृह येथे …
Read More »…आणि सभागृहात गोंधळ घालण्याचा कुटील डाव उधळला
पाणी नियोजनासंदर्भात परिषद घेणार -महापौर नितीन पाटील लघुकाळासोबत दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जाणार पनवेल : रामप्रहर वृत्तसभागृहात नगरसेवक-नगरसेविकांना आपले विषय मांडण्याचा आणि चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार असतो, मात्र पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाने स्वतः बोलण्याऐवजी कुटील रणनीती आखून प्रेक्षक गॅलरीत नागरिकांना …
Read More »अटल सेतूजवळ ‘शिवमुद्रा’ आणि ‘शिवस्मारक’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य ‘शिवमुद्रा’ आणि ‘शिवस्मारक’ उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची मंत्रालयातील दालनात बुधवारी (१ एप्रिल) विशेष बैठक झाली.या बैठकीत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची …
Read More »विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार
पनवेल : रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना महापौर नितीन पाटील यांनी बुधवारी (दि.१) झालेल्या महासभेत प्रशासनाला दिल्या.शहरातील आद्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper