Breaking News

Monthly Archives: June 2026

आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक

खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी पनवेल ः रामप्रहर वृत्तकामोठेसह पनवेल परिसरातील विविध भागांमध्ये सातत्याने होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.७) थेट भिंगारी येथील महावितरण कार्यालयात धडक …

Read More »

सुमन कल्याणपूर; एक आवाज, अनेक गोष्टी…

सुमन कल्याणपूर म्हणताच हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना पटकन ही गाणी आठवणारच. ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे… चित्रपट जब जब फूल खिले (१९६५), आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे… चित्रपट ब्रह्मचारी (१९६८), तुमने पुकारा और हम चले आए… चित्रपट राजकुमार (१९६४), मेरे महबूब ना जा… चित्रपट नूर महल …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. या संदर्भात आम्ही कार्यवाही पूर्ण केली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री …

Read More »

ज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी (दि.३) वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू होते. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबियांसह सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात …

Read More »

‌‘स्वर संध्या‌’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‌‘स्वर संध्या‌’ या सांगीतिक कार्यक्रमाने पनवेल परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. संगीत, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेल संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनाचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे थोर समाजसेवक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्त मंगळवारी (दि.२) त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते …

Read More »

अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. लि.च्या वतीने अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि.१) करण्यात आले होते. दैनिक रामप्रहरच्या कार्यालयात हा सोहळा अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात झाला.या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, …

Read More »