Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

राजू शेट्टींचा मविआ सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सातार्‍याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला तसेच दसर्‍याला शेतकर्‍यांचा शिमगा करणार्‍या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असे आवाहन शेतकर्‍यांना केले. …

Read More »

ठाकरे सरकारची पुरगस्तांना तुटपुंजी मदत

व्यापार्‍यांसह भाजपचे सांगलीत आंदोलन सांगली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसान भरपाईपोटी व्यापार्‍यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र व्यापार्‍यांना 200 रुपये ते एक हजार 500 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या या …

Read More »

भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली. याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरू असणार्‍या चकमकींमध्ये नऊ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीत भारतीय …

Read More »

केरळमध्ये 21 जणांचा मृत्यू; डझनभर बेपत्ता

तिरूअनंतपूरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21वर पोहचली आहे. शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे 12पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पर्वतीय भागात पूर आला असून नद्या ओसंडून वाहत आहेत. समोर आलेली …

Read More »

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे योग्य नाही!; परीक्षांच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

नगर ः प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा गोंधळावर संताप व्यक्त करीत आपल्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 24 ऑक्टोबरला होणार्‍या आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्यातील आणि …

Read More »

‘मविआ’चे भ्रष्टाचार म्हणजे दरोडेखोरी; भाजप नेते किरीट सोमय्यांचा घणाघात

सोलापूर ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भातील कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते रविवारी (दि. 17) सोलापूरच्या दौर्‍यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत …

Read More »

‘मविआ’च्या निष्काळजीपणामुळे कोळसा टंचाई

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा वीज प्रकल्पांमध्ये कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली, असे अहिर म्हणाले. तसेच सरकारने महाजेन्को (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी)ने …

Read More »

ऋतुराजचे पुण्यात जल्लोषात स्वागत

पुणे ः प्रतिनिधी आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मने जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याचे रविवारी (दि. 17) पुण्यात आगमन झाले. या वेळी पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या 16 सामन्यांत 635 धावा केल्या आहेत. यात एक …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे; दसरा मेळाव्यातील टीकेचा फडणवीसांकडून समाचार

नागपूर ः प्रतिनिधी शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी मुंबईत झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. …

Read More »

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा हेतू पूर्ण करणार्‍या या सात कंपन्यांपैकी एक कंपनी नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये स्थित असणारी ’यंत्र इंडिया लिमिटेड’ उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही …

Read More »