Breaking News

मुंबई – नवी मुंबई

चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल मुंबई ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन कायम; मात्र काही प्रमाणात निर्बंधांत शिथिलता

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 27) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात …

Read More »

कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ

नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला …

Read More »

मच्छीमारांच्या मदतीसाठी भाजपचे राज्यपालांना निवेदन

नवी मुंबई : प्रतिनिधी निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे. जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाही तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश …

Read More »

लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लसींची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?, असा …

Read More »

मुंबई मनपाचे ‘ते’ ग्लोबल टेंडर बनावट; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

सत्ता प्रिय नसल्याचा काँग्रेसचा सूचक इशारा मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या आदेशावरून नवनवीन वाद निर्माण होत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत संविधान नियमानुसार कामकाज महत्त्वाचे आहे. आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे विधान करीत …

Read More »

नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

सर्वपक्षीय कृती समितीला नाना पटोले यांचे आश्वासन मुंबई/पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न …

Read More »

नवी मुंबईत भाजीपाला बाजार आवारात लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न

नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी एपीएमसी घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे …

Read More »

रायगडसह 18 जिल्ह्यांत गृहविलीकरण बंद

मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भात मंगळवारी (दि. 25) झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या …

Read More »