Breaking News

मुंबई – नवी मुंबई

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? -भातखळकर; धर्मांतर रॅकेट प्रकरणाच्या तपासावरून सवाल

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर …

Read More »

नव्या निर्बंधांमुळे व्यापार्‍यांमध्ये नाराजी; नवी मुंबईत मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा बंद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्‍या टप्प्यात घेतले गेल्याने नवी मुंबई शहरात सोमवारपासून 28 जून ते 5 जुलैपर्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून व्यापारी वर्गामध्ये मात्र मोठी नाराजी पसरली आहे. दुकानांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता दुपारी चार …

Read More »

कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही

दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल …

Read More »

गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

सार्वजनिक मूर्ती चार, तर घरगुती दोन फुटांची मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही निर्बंध घालण्यात आले असून सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून या वर्षी हा उत्सव जल्लोषात …

Read More »

शिवसेनेत पुन्हा ‘लेटरबॉम्ब’

काँग्रेस आमदाराविरोधात शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पुणे ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर  आरोप करीत …

Read More »

पावसाळी अधिवेशनासाठी ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात होणार असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरिता कोविड-19 संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि …

Read More »

राज्यातील निर्बंध बदलले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागल्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. जमावावर बंदी कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण

प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल, तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण करीत असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 27) मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते …

Read More »

नवी मुंबईत पुन्हा होणार निर्बंध लागू

कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; दुकानांच्या वेळांतही बदल नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर कमी होत असतानाच नवी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्याही 50पेक्षा कमी झाल्याने शहरातील कोरोना निर्बंध उठविण्यात आले होते, मात्र मागील आठ दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्यात डेल्टा प्लसचा संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार …

Read More »

अनिल देशमुखांच्या घरांवर ईडीची छापेमारी

मुंबई, नागपूर ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून नागपूरसह मुंबईच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडेदेशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसर्‍या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आणि झाडाझडती घेतली.ईडीने शुक्रवारी (दि. 25) सकाळी अनिल …

Read More »