नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या उलवे नोड येथील अग्निशमन केंद्राचे 9029003201 व 9029003202 हे संपर्क क्रमांक तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात येत असून त्याऐवजी 8657461125 आणि 8657461126 हे नवीन मोबाईल क्रमांक तेथील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी सिडको उलवे नोडमधील नागरिकांनी आणीबाणीच्या काळात उपरोक्त नवीन क्रमांकांवर संपर्क साधावा, …
Read More »मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मतदार नोंदणी झाली नाही अशा सर्व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून शनिवारी (दि 2) व रविवारी (दि. 3) या दिवशी नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेबाबत आज …
Read More »विस्तारित गावठाण सर्वेक्षण होणार
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या मंगळवारपासून बेलापूर गावातून विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. सदर सिटी सर्वेक्षण सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्त केलेल्या पी. एन. शिदोरे सिव्हिल इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लि. …
Read More »मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम वंचित नागरिकांना विशेष संधी
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध …
Read More »सीमेवरील तणावामुळे विधिमंडळ अधिवेशन संस्थगित
मुंबई : प्रतिनिधी भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारी (दि. 28) संस्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर …
Read More »राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना दिलासा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला दिलासा देणारा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी (दि. 27) विधिमंडळात सादर केला गेला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 5449 दुष्काळी गावांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी विविध तरतुदी सरकारने केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील थकीत वीजबिल …
Read More »विमान हायजॅक करण्याची धमकी; विमानतळांवर अलर्ट
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करून विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी (दि. 23) देण्यात आली. फोन करणार्या व्यक्तीने सांगितले की, ‘एक विमान हायजॅक …
Read More »अपघातामुळे बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला
ठाणे ः प्रतिनिधी एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (19) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास तीनहात नाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (36) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी …
Read More »श्रीदेवीच्या साडीला सव्वा लाखाची बोली
मुंबई ः प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला येत्या 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाईन लिलाव ठेवला आहे. हा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत या साडीला सव्वा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 14 …
Read More »कोंढाणे धरणाच्या डीपीआरसाठी सल्लागार सेवा नेमण्यास मंजुरी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथील प्रस्तावित धरण प्रकल्पासाठीचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार सेवा नेमण्यास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात आकारास …
Read More »