Breaking News

मुंबई – नवी मुंबई

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय सेवा देणे फार गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून नेरुळ-नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोपचार देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात शनिवार 24 ऑगस्ट रोजी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात …

Read More »

डबेवाल्यांना मेट्रो-मोनोतही प्रवेश देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मेट्रो आणि मोनो रेल्वेतून डबेवाल्यांनाही प्रवास करू देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. मुंबईतील प्रवास वेगवान व सुरक्षित होण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे सुरू करण्यात आली आहे, मात्र या सेवांचा फायदा डबेवाल्यांना घेता येत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू …

Read More »

आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …

Read More »

राजकीय सभ्यता लोप पावतेय -राम नाईक; ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित

मुंबई : प्रतिनिधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्यावेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते. आचार्य अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते, पण त्यावेळी जनसंघाची परिस्थिती बघता अत्रे यांनी भूमिपूजन निमंत्रण स्वीकारले आणि त्यांनी अधिवेशनाच्या भूमीचे पूजन केले, पण आज …

Read More »

महिलांनी घराचा आर्थिक कणा बनावे -ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे

ठाणे : प्रतिनिधी महिलांनी घराचा अर्थिक कणा बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास तसेच महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरस 2019 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन, नेरूळ, नवी मुंबई येथे या प्रदर्शनाचे आयोजन …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश

मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »

पवार परिवाराचे सांत्वन

फौजी आंबवडे (ता. महड) : भारतीय मजदूर संघाचे बांधकाम विभाग प्रदेश अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी स्मिता यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्हा सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने यांनी पवार परिवाराचे सांत्वन …

Read More »

कविता आणि कथालेखन स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई  : रामप्रहर वृत्त नवी मुंबई साहित्य परिषदेचे पाचवे साहित्य संमेलन दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. यानिमित्ताने नवोदित  साहित्यिकांना संधी मिळावी या हेतूने कविता आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कविता स्पर्धेकरिता स्त्री भावनांचे दर्शन घडविणार्‍या कविता असाव्यात. कविता 16 ते 20 ओळींच्या असाव्यात. आलेल्या कवितांचा …

Read More »

‘रसशास्त्र संभाषा’ परिसंवादाचे आयोजन

नवी मुंबई : प्रतिनिधी आयुर्वेदातील वनस्पती व प्राणीज घटकांबरोबरच सुवर्ण, रौप्य आदी विविध धातू व पारदसारख्या अन्य खनिज घटकांचा रोगनिवारणासाठी औषध म्हणून कशा पद्धतीने वापर करावा याचे मार्गदर्शन करणारे औषधी निर्माणाचे शास्त्र म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्रातील औषधांची निर्मिती हे श्रीधूतपापेश्वर लिमिटेडचे खास वैशिष्ट्य. 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूतपापेश्वर लिमिटेडद्वारा विविध …

Read More »

एसबीआय डेबिट कार्ड होणार हद्दपार

मुंबई : प्रतिनिधी भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली …

Read More »