Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई ः प्रतिनिधी न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा …

Read More »

ब्लॅकमेलिंग करणार्या पाच पोलिसांचे निलंबन

नवी मुंबई ः प्रतिनिधी मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्‍या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्‍हाडे अशी त्यांची …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा धडाका; सहा दिवसांत 22 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा ; 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद

मुंबई ः प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्‍यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून …

Read More »

यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरणार? मान्सूनला उशीर; तरीही शेतकरी आशेवर

मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या देशवासीयांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे़. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़. ‘स्कायमेट’ने यापूर्वी मान्सूनचे आगमन 4 जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. …

Read More »

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अ‍ॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य

मुंबई ः प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको, …

Read More »

‘उमेद’तर्फे खाद्यपदार्थ, वस्तूंचे प्रदर्शन

नवी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-खारघर मधील ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे, तसेच लोकपयोगी वस्तूंचे  प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने ठेवण्यात आली आहेत. 10 मे पासून बीड जिल्ह्यातील महिला बचत गट येथे आपले खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्रीसाठी आल्या आहेत. …

Read More »

नेरूळ येथे सहा वाहनांची धडक

नवी मुंबई : प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावर सहा वाहनांची रविवारी (दि. 12) दुपारी एकमेकांना धडक बसली. सर्वात पुढे असलेल्या कार चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. यात कोणीही गंभीर झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास नेरूळ उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने सुसाट जात असलेल्या कारचालकाने …

Read More »

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य करणार; नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांचे आश्वासन

मुंबई ः प्रतिनिधी प्रवीण परदेशी यांनी नुकताच मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा …

Read More »

वायुगळतीने तीन कामगारांचा मृत्यू

तारापूर ः प्रतिनिधी तारापूर येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीने तीन कामागारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनाही …

Read More »

‘सिम स्वॅप’द्वारे पाच लाखांची रक्कम गायब

मुंबई ः प्रतिनिधी सिम स्वॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. स्किमरने डेबिट कार्ड डेटा चोरी करून हे पैसे काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पैसे काढल्याचा एकही संदेश या खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर आला नाही. त्यामुळे …

Read More »