Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईकरांसाठी पाताळगंगेचे पाणी

मोरबे प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणीसाठी प्रस्ताव आयआयटीकडे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : नवी मुंबईची पुढील 20 वर्षांनंतरही तहान भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने आताच तयारी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पातळगंगा नदीतून पाणी उचलून ते मोरबेत टाकण्यासाठीचा प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी 282 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रस्ताव …

Read More »

20 लाखांपर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त

पेन्शनर्सला दिलासा मुंबई ः प्रतिनिधी : 20 लाखांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅज्युटीवर आता कोणताही कर आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली असून या निर्णयामुळे 2018-19मध्ये निवृत्त होणार्‍या नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली असून ग्रॅज्युटी कायद्यांतर्गत न येणार्‍या नोकरदारांना हा निर्णय …

Read More »

उधाणग्रस्त शेतकर्यांना मिळणार आर्थिक मदत

मंत्री दिवाकर रावते यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई ः प्रतिनिधी : समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नव्हती, पण राज्याचे खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अनुसरुन मंत्रिमंडळ …

Read More »

मनसेचे एकमेव आमदार सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांपाठोपाठ राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे यांनी मंगळवारी (दि. 5) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज …

Read More »

नगरसेवक भोपींच्या पाठपुराव्याने पथरस्त्यांचे काम

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त सेक्टर 8मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून पथरस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगरसेवक संजय भोपी, महानगरपालिका स्थायी समिती सदस्या सीताताई पाटील, भाजपा पनवेल शहर  …

Read More »

मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त चुनाभट्टी येथे आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये उपस्थित होत्या. या वेळी कवी अरुण म्हात्रे …

Read More »

नवी मुंबई मनपाच्या 12 शाळा झाल्या हायटेक

आमदार मंदा म्हात्रे यांचा विकास निधी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना सायन्सची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त सायन्सकडे वळावा याकरिता शाळांत डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीमधून 66 लाखांचा निधी …

Read More »

पेणनजीक धरमतर येथे चीनचा नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चीनमधील नाइन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीमध्ये शनिवारी करार झाला. त्यानुसार रायगडमधील धरमतर येथे नाइन ड्रॅगन्सचा प्रकल्प उभारणार असून, येत्या पाच वर्षांत साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, तसेच या कालावधीत 10 हजार कोकणवासीयांसाठी नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास …

Read More »

फुटपाथवरील झाडांचे संगोपण करा

खारघर भाजपची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांचे नीट संगोपण केले जावे, अशी मागणी भाजपतर्फे सिडको प्रशासनाला करण्यात आली आहे. खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस गीता चौधरी व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडकोचे खारघर शहराचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांना याबाबतचे निवेदन …

Read More »

मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत

खारघरमध्ये न्यू इंडिया चौपाल मोहिमेचा प्रारंभ, मान्यवरांची उपस्थिती, नागरिकांचा प्रतिसाद खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून भाजपतर्फे जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खारघर शहरात मोदी सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती न्यू …

Read More »