नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर नेमबाज अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांच्यासह भारतीय खेळाडूंची अखेरची तुकडी सोमवारी मायदेशी परतली. त्यांचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत विक्रमी कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदकांची कमाई केली.टोकियो …
Read More »टीम इंडिया सुसाऽऽट!
ऐतिहासिक विजयानंतर ‘डब्ल्यूटीसी’मध्ये अग्रस्थानी दुबई : वृत्तसंस्थाभारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. विराटसेनेकडे आता पहिल्या क्रमांकाची खुर्ची आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 157 धावांनी जिंकला. या संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54.17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे …
Read More »जिल्ह्यात एक लाख 76 हजार लसीचा पुरवठा
आरोग्य प्रशासनाकडून पहिल्यांदाच 35 ग्रामपंचायतींना लसीचा पुरवठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) एक लाख 76 हजार लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील 35 लसीकरण मान्य ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच प्रत्येकी 200 लसीचा पुरवठा आरोग्य विभागाकडून केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य …
Read More »गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड पोलीस सज्ज
महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय या महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर रायगडच्या हद्दीत गणेश भक्तांच्या मदतीसाठी …
Read More »बोर्ली परिसरात अतिवृष्टी
बाजारपेठ पाण्याखाली; साळाव चेकपोस्टजवळ दरड कोसळली रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बोर्ली बाजारपेठ पाण्याखाली गेली, त्यात व्यापार्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर पाणी व मातीचा चिखल झाला. …
Read More »गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदीची पेण बाजारपेठेत लगबग
पेण : प्रतिनिधी गणेशाचे आगमन चार दिवसांवर आले असून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणार्या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी पेण बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि आठवडा बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणार्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे पेणची बाजारपेठ इकोफ्रेंडली साहित्यांनी सजली आहे. …
Read More »‘अंनिस’च्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला रोह्यात प्रतिसाद
रोहे : प्रतिनिधी निसर्गातील कुठल्याही घटनेला कार्यकारण भाव असतोच, तो शोधला पाहिजे. तसे न केल्यास बाबा, बुवा यांचे फावते व त्यांची संस्थाने उभी राहतात, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चे रायगड जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी रविवारी (दि. 5) येथे केले. अंनिसतर्फे रोह्यात रविवारी एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात …
Read More »कोकण रेल्वेने रायगडकरांना दिलासा द्यावा
कोकणची माणसे साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी म्हणतात, ते खरेच आहे. म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वे प्रशासनाने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्नभावाची वागणूक दिली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला तरी दिवा-रोहा गाडीही सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात …
Read More »काळुंद्रे गावात जाणार्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात
नगरसेवक तेजस कांडपिळे यांचा पाठपुरावा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे गावात जाणार्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याची मागणी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी (दि. 7) तेथील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाली …
Read More »चिपळे-विहीघर रस्त्याची डागडुजी धोकादायक
खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी! पनवेल : वार्ताहर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भगतवाडी, चिपळे-नेरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत आवाज उठवल्यानंतर येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र हे खड्डे बुजवणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी असेच म्हणावे लागेल. खड्ड्यामध्ये टाकलेली खडी वर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper