पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील इंडिया बुल्स येथे विलगीकरण कक्षातील एका महिलेवर अत्याचार करणार्या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी पनवेल तालुका बार कौन्सिल असोशिएशनकडे विविध राजकीय संघटना व संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणीसुद्धा …
Read More »उरणमध्ये टाकळा संवर्धन स्पर्धा; दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतीसाठी अनोखा उपक्रम
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानमाळात पूर्वी ठिकठिकाणी पावसाळ्यात आढळणारी टाकळा ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण अशी रानभाजी म्हणून ओळखली जाते. ही नैसर्गिक रित्या उगवलेली रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे उरण तालुक्यातील वशेणी येथील इतिहास संपादकीय मंडळाच्या निरिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे टाकळा या भाजीचे संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय …
Read More »कोरोना : गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक
स्वराज्याचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या अनेक घोषणा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ठरल्या. टिळकांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि ती मशाल पुढे सलग 31 वर्षे तशीच पेटत राहीली. भारतीयांना …
Read More »‘मानसिकता बदलण्याची गरज’
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारी असो की इतर कोणताही साथीचे आजार! या कालावधीत नागरिकांना मिळणारे सल्ले तंतोतंत पाळले गेले. तर आपण त्यावर सहज मात करू. पण आपले काही नागरिक अशा मार्गदर्शनाला पायदळी तुडवून आपल्या मनाप्रमाणे वागत असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता बदलली तर कोरोनासारख्या …
Read More »घरगुती बाप्पाच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात; कोरोनामुळे मागणी घटली; स्टॉलला परवानगी नसल्याने विक्रेते नाराज
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. बाप्पांचे अगमन जवळ आले, तरी बाजारात कोणतीही लगबग दिसत नाही. गणपती स्टॉलचाही पत्ता नाही. त्यामुळे अनेक कारागिरांनी बाप्पाच्या मूर्तीची विक्री ऑनलाइनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल परिसरात या ऑनलाइन नोंदणीला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. सध्या बाप्पाची वेगवेगळी रूपे …
Read More »कोरोनामुळे ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी; घराबाहेर पडणेही ठरतेय धोकादायक, विशेष काळजी घेण्याचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनामुळे 500पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील 68 टक्के नागरिक 50पेक्षा जास्त वयोगटांतील आहेत. ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकत असून, शरीर उपचारास साथ देत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये व राज्य शासनाकडून …
Read More »मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत
मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुरूड तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे. आता फक्त डोंगराळ व जिथे खूपच पडझड झाली तेवढाच भाग अंधारात असून तेथील वीजपुरवठाही तातडीने सुरळीत …
Read More »गणेशमूर्ती कारखानदारांना कोरोनाचा फटका
नागोठणे ः प्रतिनिधी दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र श्रावण महिना सुरू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने कोरोनाच्या महामारीचा फटका येथील एका दिव्यांग कारखानदाराला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या तर प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली. …
Read More »शिल्पकारनगरला मिळाल्या मूलभूत सोयीसुविधा
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकारनगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे वीज-पाणी, रस्ते आदी मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात चार विजेचे पोल आणि त्यावर लाइट बसविण्यात आले आहेत. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकारनगरमधील जनतेला भेडसावणारे प्रश्न …
Read More »पोलादपुरात पोलीस कर्मचार्यांसह सहा कोरोना पॉझिटिव्ह
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात मागील दोन दिवसांत प्राप्त कोविड टेस्टच्या अहवालानुसार सहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील तीन रुग्णांचा समावेश असून त्यापैकी दोन रुग्ण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरीज एका मृत कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांकडून कोविड टेस्ट करण्यास नकार देण्यात आल्याने यंत्रणा हतबल असल्याची माहिती प्राप्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper