Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही, तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी येत्या गुरुवारी …

Read More »

सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला विवेक पाटील देतातच कसे?

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवत रायगडमध्ये

किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन महाड : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व अखिल भारतीय संच मंगळवार (दि. 11)पासून तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्‍यावर आला असून, संघाची संच बैठक पहिल्यांदाच जिल्ह्यात होणार आहे. भागवत व सहकार्‍यांनी दौर्‍याच्या सुरुवातीला किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी व होळीचा माळ येथील …

Read More »

मांडूळ सापाची तस्करी

खालापुरात तीन आरोपी जेरबंद; पोलीस कोठडी खालापूर : प्रतिनिधीअंधश्रद्धेतून मांडूळ सापाच्या तस्करीचे प्रकार अलिकडे वाढू लागले असून, खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या मांडूळ सापासह तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खालापूर तालुक्यातील वावोशी परिक्षेत्रात मांडूळ जातीचा …

Read More »

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जनभावना तीव्र

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …

Read More »

दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ

काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्‍या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. अपेक्षेप्रमाणेच दिल्ली …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी

पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्याची भेट खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिककडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश …

Read More »

पत्रकार मयूर तांबडे यांना पुरस्कार

पनवेल ः बातमीदार युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. 16) आयडियल पब्लिक स्कूलसमोर, देवीचा पाडा (तळोजा) येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पत्रकार मयूर तांबडे यांना स्व. भरत कुरघोडे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युथ फोरम …

Read More »

स्काऊट-गाईड निसर्ग शिबिर 2020 उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. 11) स्काऊट-गाईड निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास पंचायत समितीचे …

Read More »

रिटघर हायस्कूलमध्ये विद्यार्थी शुभचिंतन समारंभ उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. 11) शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांनी …

Read More »