Breaking News

महत्वाच्या बातम्या

तळोजातील भुयारी मार्गाची रेल्वे अधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकावर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक प्रदीप पोळ यांनी पाहणी केली. भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश अभियंता विभागाला दिले. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजुने होणारी वाहतूक कोंडी …

Read More »

भाजपच्या प्रयत्नाने करंजाडे पाणीप्रश्न होतोय सुरळीत

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या करंजाडे पाणीप्रश्नावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असुन सद्यस्थितीत पाणीपुरवठा 12.5 एमएलडीपर्यंत होत आहे, तर पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईल व 14-15 एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मिळाली. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांची …

Read More »

संसदेत शिवसेनेचा गट स्थापणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजधानी दिल्लीत घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज हिंदुत्ववादी विचारांना आणि युतीचे सरकार स्थापण्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राहुल शेवाळे गटनेते असतील, तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील, असे सांगत …

Read More »

भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. पनवेलमधील …

Read More »

सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे; केंद्राची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सुट्या धान्यावरील पाच टक्के जीएसटी मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून हा याबाबत माहिती दिली. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही. जीएसटी लागू झाला तेव्हा …

Read More »

पावसाळी हंगामात रानभाज्या बहरल्या

मुरूड : प्रतिनिधी दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी, आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रांतात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्या जातात. …

Read More »

पूरग्रस्तांना आधी मदत मग पुनर्वसन!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; वर्ध्यात पाहणी वर्धा : प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत …

Read More »

ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करा : रामदास कदम

मुंबई : प्रतिनिधी माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी …

Read More »

आक्कादेवी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवी माळरानाच्या धरणावर रविवारच्या सुटीनिमित्त उरण, पनवेल व नवी मुंबई येथील पर्यटकांनी धरणात पोहण्याबरोबर धरणातून फेसळणार्‍या पाण्यावर रोमहर्ष मजा लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यामुळे …

Read More »

खारघरमध्ये पालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात

खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि खुल्या गटारावर झाकण बसविण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे सिडकोने नेमलेल्या ठेकेदाराने कोणती कामे केली, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खारघर वसाहत …

Read More »