पनवेल : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पनवेल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत सब ज्युनिअर गटात पेण येथील संसारे फिटनेसचा कुमार अथर्व लोधी, ज्युनिअर स्पर्धेत कुमार कुणाल पिंगळे (बीवायएफसी, जिम खोपोली)आणि सीनिअर पुरुष गटात अक्षय शांनमुगम्म (खोपोली, आयरनमिट जिम) विजेता ठरला. स्पर्धा रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »पोलादपुरात बूस्टर डोसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलादपूर : प्रतिनिधी पहिल्या आणि दुसर्या कोरोना प्रतिबंधक डोसनंतर आता तिसर्या बूस्टर डोसला पोलादपूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. मंगळवारी (दि. 19) शहरातील स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली येथून बूस्टर डोसची सुरुवात झाली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीदेखील स्वामी कवींद्र परमानंद …
Read More »कोलाडच्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात सापांविषयी जनजागृती
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 19) राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सापांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे सापांविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये नाग, घोणस, ़फुर्श्या आदी विषारी सापांचा समावेश होता तर धामण, मांडूळ आदि …
Read More »एम इंडिकेटरवर नेरळ जंक्शनचे नाव गायब
नेरळ लब्धी गार्डन असे नामकरण; प्रवासीवर्गात संतप्त प्रतिक्रिया कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या दफ्तरी जंक्शन रेल्वे स्थानक अशी नोंद असलेल्या नेरळ स्थानकाचे नाव एम इंडिकेटरवर नेरळ-लब्धी गार्डन असे दर्शविले जात आहे. त्याबद्दल नेरळमधील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिशांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे आणली. त्यानंतर केवळ तीन वर्षांनी नेरळ या स्थानकात …
Read More »सुभाष नगर, मस्को कॉलनी, लव्हजी, चिंचवली परिवहन सेवा पुन्हा चालू करावी -भाजप युवा नेते राहुल जाधव
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली गाव ते वासरंग-मस्को कॉलनी (सुभाष नगर)-स्टाफ कॉलनी सर्कल (जगदीश नगर)-लव्हजी-चिंचवली ही सिटी बस सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली होती. या मार्गावर पुन्हा सिटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजप युवानेते राहुल जाधव यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे बुधवारी (दि. 20) निवेदनाद्वारे …
Read More »कर्जतच्या पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक, प्रवासी त्रस्त
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मुरबाड रस्त्यावरील आरवंद गावाकडे जाणार्या रस्त्याची पावसात दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून संबंधित अधिकार्यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक धुळे …
Read More »अलिबाग समुद्र किनार्याचा बंधारा उखडला
अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात आलेल्या उधाणाच्या लाटांच्या मार्यामुळे अलिबाग समुद्र किनार्यावरील बंधारा उखडला गेला आहे. या बंधार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनार्यावरील सेल्फी पॉईंटदेखील मोडला आहे. तीन दिवसांपासून समुद्राला मोठी भरती आली. उधाणाच्या भरतीचा अलिबाग किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसला. भरतीच्यावेळी महाकाय लाटा किनार्यावर धडकत होत्या. ज्यामुळे अलिबाग समुद्र …
Read More »सीकेटी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षिस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा विविध उपक्रम राबवून साजरा केली जात आहे. त्याअंतर्गत पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (दि. 20) झाला. या कार्यक्रमाची सुरुवात स्वर म्हात्रे …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अविष्कार अभिमुखता व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली. या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, …
Read More »फेसबुकवरून ऑनलाइन कपडे मागवणे महिलेस पडले महागात
पनवेल : वार्ताहर फेसबुकवरून ऑनलाइन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागातील महिलेस चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सायबर चोरट्याने कुरीयर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून या महिलेने मागविलेले ऑनलाइन कपड्याचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी गंडा घालून खात्यातून एक लाख 68 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper