पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थी आपल्या गुरूकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्या वर्षा ठाकूर यांनी केले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या वतीने …
Read More »नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा
पनवेल ः प्रतिनिधी सिडकोमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील रहिवाशांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या विभागातील पाणीपुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी …
Read More »सीकेटी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. …
Read More »आजपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर कारवाई
पनवेल मनपा करणार अंमलबजावणी पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानूसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकवर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात शनिवार (दि. 16)पासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकबंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना …
Read More »कामगार क्षेत्रात आत्मप्रेरणेने काम करा -सुधीर घरत
उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघ संलग्न असणार्या 32 महासंघांचे अखिल भारतीय पाच दिवसीय अभ्यासवर्ग शिबीर 13 ते 17 जुलै या कालावधीत नागपूर येथे होत आहे. या शिबिरात भारतीय मजदूर संघाला संलग्न असणार्या 32 महासंघाचे सुकाणू समितीचे 124 पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या वेळी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या …
Read More »रोहा तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीची प्रात्यक्षिके
रोहे : प्रतिनिधी यांत्रिकी पध्दतीने भात लागवड फायदेशीर असून त्याची प्रात्यक्षिके रोहा तालुक्यात घेण्यात आली आहेत. या यांत्रिकी पध्दतीच्या भात लागवडीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे. मजूरांचा तुटवडा व त्यामुळे घटत चाललेले भात क्षेत्र यावर उपाय म्हणून यांत्रिक पध्दतीने भात लागवड करणे …
Read More »बाईक रॅलीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत
43 स्थानकांना भेटी व 1665 किमीची मजल कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने 1 जुलैपासून विविध स्थानकांवर ’आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाइक रॅली सुरू झाल्या आहेत. बाईक रॅलींनी मध्य रेल्वेवरील एकूण 1665 किमी …
Read More »रेवस-आवरे पोर्टसाठी घेण्यात आलेल्या जमिनी परत करा
भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पून्हा मूळ शेतकर्यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून केली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी …
Read More »पेणमध्ये 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी
चार तासात आरोपी जेरबंद पेण ़: प्रतिनिधी पेण खाटीक आळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून दोन जणांना अटक केली आहे. सुमन विरेंद्र बेरा (वय 26) यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. …
Read More »धेरंड गावात घुसले उधाणाचे पाणी
अनेक घरांतील सामानाचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे गुरुवारी (दि. 14) अलिबाग तालुक्यातील धेरंड गावतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली. खरबंदिस्ती फुटली असल्यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले. त्यामुळे गावकर्यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. या घरांमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper