Breaking News

महत्वाच्या बातम्या

हागणदारीमुक्त अभियानासाठी कर्जत नगर परिषद प्रयत्नशील

पब्लिक टॉयलेटमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरा मुक्त शहर बरोबर हागणदारी मुक्त शहराच्या नामांकनमध्ये तिसरे स्थान मिळविण्यासाठी कर्जत नगरपालिका सज्ज झाली आहे.त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील गतिरोधकांची दुरवस्था

पनवेल : वार्ताहर गतिरोधकांच्या दूरवस्थेमुळे वाहनांची नासधूस होत असल्याचे प्रकार तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील प्रवासादरम्यान अनुभवायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावरील गतिरोधक वेळीच दुरूस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडून वर्तविली जात आहे. याबाबत तळोजा वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा कार्यालयाला चार पत्र पाठविले आहे, मात्र वाहतूक …

Read More »

रोह्यातील धोकादायक रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडून पाहणी

रोहे : प्रतिनिधी शहरातील मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. त्याच्या समोरील रस्ता अरुंद झाल्याने धोकादायक झाला आहे. सोमवारी (दि. 21) राम मारुती चौकात शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केल्यानंतर पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी काकासाहेब गांगल मार्ग व भाटे वाचनालयाकडे जाणार्‍या रस्त्यांची पाहणी करत येणार्‍या अडचणी जाणून …

Read More »

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आता अँजिओग्राफी, कॅन्सर निदानही होणार

अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता मुंबईत जावे लागणार नाही. कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्राचे लोकार्पण मंगळवारी (दि. 22) जिल्हा …

Read More »

‘डीएव्ही’च्या वाढीव फीविरोधात पालकांचे आंदोलन; तक्रारींसंदर्भात आज सुनावणी

नवी मुंबई : प्रतिनिधी सिवूडस येथील डीएव्ही पब्लिक स्कूलने शाळेच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त फी घेऊ नये यासाठी पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. 22) सकाळी सर्व पालक शाळेसमोर एकवटून डीएव्ही शाळा अतिरिक्त फी का वसूल करते? याचा जाब विचारण्यासाठी जमले असता शाळेच्या मुख्याध्यापका कांचन मनोजा यांनी पालकांना वेळ देऊनदेखील …

Read More »

मुरूडमध्ये ढगाळ वातावरण

आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने …

Read More »

‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित

नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्‍या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्‍या नद्यांमध्ये  कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चला

पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड …

Read More »

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे …

Read More »

पनवेलमध्ये धम्म परिषद उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 21) धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत …

Read More »