Breaking News

महत्वाच्या बातम्या

एमबीएच्या विद्यार्थ्यांना आगरी भाषेत दिले धडे; जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपक्रम

ठाणे : प्रतिनिधी जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वाघबीळ गावातील प्रा. सागर पाटील यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना क्रीएटीव्हीटी अ‍ॅण्ड इनोवेटीव्ह मॅनेजमेंट या विषयाचे धडे चक्क आगरी भाषेतून दिले. प्रा. पाटील हे गेले 12 वर्ष एमबीएच्या मुलांना शिकवत असून अनेक महा विद्यालयात त्यांनी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात चर्चासत्र

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे गुरुवारी (दि. 17) करिअर गाईडंस प्लेसमेंट अ‍ॅण्ड काऊंसेलिग सेलतर्फे भारतातील लोकसेवक, सरकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महादेव …

Read More »

अग्नीग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार महेश बालदी प्रयत्नशील

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील वशेणी गावात 20 फेब्रुवारी 2022 रोजी कुसुम गावंड यांच्या घराला आग लागून सर्व सामान आगीत भस्मसात झाले. त्यामुळे कुसुम गावंड यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीकोणातून आमदार महेश बालदी हे प्रयत्न करीत आहेत. आमदार महेश बालदी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रेत आरोग्य शिबिराचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबवत आहे. त्यानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काळुंद्रे येथे मोफत आरोग्य शिबिर बुधवारी (दि. 23) आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. काळुंद्रे येथील गणपती मंदिरामध्ये झालेल्या या शिबिराला नागरीकांना चांगला …

Read More »

राष्ट्रीय युवा संसदेच्या राज्यस्तरीय निवड फेरीत ‘सीकेटी’चे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संसदीय आयुधे व त्यांच्या यथोचित उपयोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले जाते. त्याच्या रायगड जिल्हा प्राथमिक फेरी व राज्यस्तरीय निवड फेरीत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरिता, नागरिकांच्या विनंतीस मान देऊन 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोने 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या …

Read More »

मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे  कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस …

Read More »

खालापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट

खोपोली : प्रतिनिधी नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते. सरकारी निमसरकारी कर्मचार्‍यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्‍यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर …

Read More »

थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट

एक गंभीर जखमी तर दुसर्‍याला मानसिक धक्का अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये बुधवारी (दि. 23)सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर एका कर्मचार्‍याला मानसिक धक्का बसला आहे. …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्यांचे माणगाव तहसीलदारांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने लाक्षणीक संप पुकारला होता. त्याला बुधवारी (दि. 23) माणगावातही प्रतिसाद मिळाला. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली माणगावमधील राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले असून त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तहसीलदार प्रियंका अयरे कांबळे …

Read More »