Breaking News

महत्वाच्या बातम्या

गृहीतकांच्या चाचणीवर व्याख्यान

खारघच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमधील उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (दि. 15) रोजी गृहीतकांच्या चाचणीवर टेस्टींग ऑफ हायपोथेसिस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गणित विभागाच्या …

Read More »

‘अभाविप’चा मुंबईत रास्ता रोको

तमिळनाडूतील आत्महत्याग्रस्त विद्यार्थिनीला न्याय मिळण्याची मागणी मुंंबई : प्रतिनिधी तमिळनाडूमधील बळजबरी धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एम. लावण्या या विद्यार्थिनीला न्याय मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मुंबईत सायन सर्कल येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या …

Read More »

तुकाराम हरी वाजेकर मार्ग नामफलकाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण

उरण : बातमीदार श्रमजीवी जनतेचे नेते, उरणचे भाग्यविधाते स्व. तुकाराम हरी वाजेकर यांची 41वी पुण्यतिथी मंगळवारी (दि. 15) उरण पेठा मिठागर कामगार संघाच्या कोटनाका येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानंतर उरण शहरातील राजपाल नाका ते राघोबा मंदिर कोटनाका या रस्त्याचे तुकाराम हरी वाजेकर मार्ग असे नामकरण करण्यात येऊन या नामफलकाचे …

Read More »

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा

पुणे : प्रतिनिधी मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पक्ष पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 15) …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी बी. सी. ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिक ठाकूर यांची निवड …

Read More »

तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे तसेच या सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागल्याचे सांगत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. ते एका …

Read More »

खारघर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील डी-मार्टजवळील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या केंद्रात सुरू करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आदींच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) झाले. …

Read More »

एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू, सात जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ एका ट्रकचा (एमएच 12 एसएक्स …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत निजामपूर संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी येथील मंगु स्टार क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत राहीला इलेव्हन निजामपूर संघाने अंतिम सामन्यात आय्यान इलेव्हन माणगाव संघाचा दारुण पराभव करीत वाकडाई चषक पटकाविला. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन संघाचा फलंदाज अक्षय म्हात्रे याने शतकी खेळी केली. त्याने केवळ …

Read More »

युनिफाईट स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड युनिफाईट असोसिएशनच्या वतीने पनवेलजवळील आकुर्ली येथील सेंट अ‍ॅण्ड्र्यूज इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी नवव्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि दोन कांस्य अशी 21 पदके जिंकून तृतीय …

Read More »