Breaking News

महत्वाच्या बातम्या

किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी

पाली ः प्रतिनिधी राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत असून रायगडातही रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बंदीचे आदेश जारी केले आहेत. किल्ले रायगडावरील रोपवे ही पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत …

Read More »

व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटाला अटक

मुरूडमध्ये पाच कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त मुरूड, अलिबाग ः प्रतिनिधी परफ्यूम बनविण्यासाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या तीन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुरूड तालुक्यातील काशीद येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो ग्रॅम वजनाची उलटी आणि दोन मोटरसायकल असा पाच कोटी 90 …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील

सभापतीपदांवरही भाजपचे वर्चस्व पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि प्रभाग समिती पदांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. 11) झाली असून अपेक्षेप्रमाणे सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपमहापौरपदी खांदा कॉलनीतील कर्तव्यदक्ष नगरसेविका सीताताई पाटील विराजमान झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव …

Read More »

भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारीला काम बंद आंदोलन

कोरोना प्रादूर्भावामुळे 13 जानेवारीची भूमिपुत्र परिषद होणार मर्यादित स्वरूपात पनवेल ः रामप्रहर वृत्त 13 जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय कृती समितीद्वारे जाहीर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना समितीतर्फे सांगण्यात आले की, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …

Read More »

मास्क लावण्यासाठी पोलीस आक्रमक; खोपोलीत तणाव

खोपोली : प्रतिनिधी करोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, मास्क न लावणार्‍यांविरोधात  कारवाई करण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर  खोपोली व परिसरात कार्यवाही केली जात आहे. मास्क लावण्यावरून थोरवे बंधू सुरभी ज्वेलर्समधील गणेश नामक कर्मचारी आणि खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्यात रविवारी किरकोळ वाद झाला. तो …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष पडतोय अपुरा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात खाटा कमी पडत आहेत. तेथे फरशिवर  गादी टाकून प्रसूतीसाठी येणार्‍या मातांवर उपचार केले जात आहेत. प्रसूती कक्षदेखील अपुरा पडत आहे.  त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्‍या मातांची गैरसोय होत आहे.  प्रसूती कक्षात खाटा वढवाव्यात, अशी मागणी  केली जात आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात …

Read More »

कर्जत कळंब येथील गोदाम भाताने भरले

नवीन भात खरेदीत अडथळे कर्जत : बातमीदार मागील वर्षी खरेदी केलेल्या भाताची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने उचल केली नसल्यामुळे कळंब (ता. कर्जत) येथील गोदाम भाताच्या पोत्यांनी भरले आहे. त्यामुळे या हंगामात भाताची खरेदी करून साठवण करण्यात नेरळ विविध कार्यकारी सोसायटीला अडथळे येत आहेत. कर्जत तालुक्यात चार ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत …

Read More »

नेरळमधील रेल्वेफाटक उडवून टेम्पोचालक फरार

कर्जत : बातमीदार नेरळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्‍या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने हे फाटक उडवून तो फरार झाला. दरम्यान, फाटक नादुरुस्त झाल्याने गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंद केले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब …

Read More »

आम्ही मोदीजींच्या सोबत!

खोपोलीत भाजपचे स्वाक्षरी मोहीम अभियान खोपोली : प्रतिनिधी पंजाब राज्याच्या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केल्याचा आरोप करीत खोपोली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. 11) शहरातील दीपक चौकात आम्ही सर्व मोदीजींच्या …

Read More »

कृषी व इको टुरिझमला अधिक पसंती

सुधागड तालुक्यात माती, कुड व बांबूची घरे सजली पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात नैसर्गिक संसाधने वापरून बनविलेल्या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारे घरे बांधणार्‍या करागिरांची मागणीदेखील वाढली आहे. शहरातील अनेक लोक अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. मागील महिन्यात …

Read More »