पाली ः प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या अकराव्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने वरिष्ठ पुरुष 75 ते 80 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 14 क्लबमधील 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप …
Read More »खेलो इंडिया अंतर्गत ‘सीकेटी’त कुस्ती सामने
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिमखाना समितीच्या वतीने मंगळवारी (दि.14) खेलो इंडिया अंतर-विद्यापीठीय कुस्तीचे निवड सामने आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मोहन अमृले प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »एनबीपीएलमध्ये नेरळ इंडियन विजेता
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका बॉक्स केईकेत असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित नेरळ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचे विजेतेपद नेरळ इंडियन्स संघाने पटकाविले. 32 व्यावसायिक संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे परदेशी मैदानावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे सलग तिसरे वर्ष होते. स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली गेली. अंतिम सामन्यात तन्वीर शेख-मुस्तफा तांबोळी यांच्या …
Read More »राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; पुण्याला दुहेरी मुकुट
सोलापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अमॅचूर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने 57 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे झाली. या स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. यापूर्वी 1995-96 साली कुळगाव (ठाणे) येथे झालेल्या 34 व्या पुरुष- महिला राज्य …
Read More »रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बक्षीस व सत्कार समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा निवड चाचणीचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 12) आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सिद्धार्थ दास याने प्रथम क्रमांक पटकावला. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गाढी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असून, विकास कामांचा झंजावात सुरू आहे. त्याअंतर्गत सुकापूर ते देवद या गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. या वेळी …
Read More »माथेरानमधील ‘त्या’ हत्येचे रहस्य उलगडले; आरोपी 24 तासांत जेरबंद
कर्जत : बातमीदार माथेरानच्या इंदिरा गांधी नगरमधील एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चारित्र्याच्या संशयावरून या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, रायगड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आरोपीला नवीन पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. नवीन पनवेल येथे राहणारा तरुण रामसिलोचन पाल …
Read More »भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 13) साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचत्य साधून जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप, तसेच पंचायत समिती शेष फंडातून करण्यात येणार्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेतर्फे पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. पनवेल महानगरपालिकेंतर्गत राहणार्या कुष्ठपीडित नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपीडितांना महापालिकेने प्रतिमहा रु. 2500 विशेष अनुदान मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे मिळणार्या अल्प …
Read More »नवीन पनवेल येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात महापालिकेच्या माध्यामतून राजीव गांधी मैदानात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र’ सुरू होणार आहे. या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) भूमिपूजन झाले, तसेच या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper