Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल, उरण, नवी मुंबईत दत्त जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गावदेवीपाडा येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्तजयंती नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपति सुधाकर भाऊ घरत, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, …

Read More »

अंधेरी कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू त्वरीत सुरू करा

भारतीय मजदूर संघाची मागणी मुंबई :प्रतिनिधी अंधेरीतील कामगार राज्य विमा रुग्णालयाला 17 डिसेंबर 2018 आग लागली होती. या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे रुग्णालय बंद असून ते त्वरित सुरू करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवस

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री  सुरेश पाटील हे होते. त्यांनी …

Read More »

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उदघाटन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरणचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले. यासोबत त्यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. …

Read More »

कळंबोळी मंडलतर्फे पिशव्यांचे वाटप

कळंबोली : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत धान्य वाटप सुरू असताना पिशव्यांचे वाटप कळंबोळी मंडलतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम कार्यक्रमचे संयोजक संतोष मानसिंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी कळंबोली सरचिटणीस संजय दोडके व सरचिटणीस दिलीप बिष्ट, उपाध्यक्ष संदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास खेडेकर, भिसे व रवी …

Read More »

रेल्वे स्थानकांत लसीकरणाला चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकल प्रवासावरील काही निर्बंध हटिवण्यात आल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रवाशांसाठी श्गहरातील पाच रेल्वे स्थानकांवर लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. शहरातील इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसला तरी या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या केंद्रांवर 11,120 लसमात्रा देण्यात आल्या असून यात दुसरी लस …

Read More »

नवी मुंबईतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांमध्ये वाढ

आकडा 18 वर, पालकांनी घेतली धास्ती! नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट आहेच. सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावलीदेखील जारी केली होती, मात्र …

Read More »

एकविशीवर शिक्कामोर्तब

केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय किमान 21 करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. खरे तर हा निर्णय केव्हाच व्हायला हवा होता. परंतु काँग्रेसच्या राजवटीत मतपेढीच्या राजकारणात तो वर्षानुवर्षे रखडला. पहिली बेटी, धनाची पेटी अशी म्हण फार पूर्वीपासून प्रचलित होती. पण त्या धनाच्या पेटीचे समाजाने काय …

Read More »

पालघरमध्ये तरुणाच्या सापासोबत दोरीउड्या; व्हिडीओ व्हायरल

पालघर ः प्रतिनिधी पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्या. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये तरुण हातात धामण जातीचा साप पकडून त्याच्यासोबत दोरीउडी मारत असल्याचे दिसत आहे. तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेर्‍यात कैद करण्यात आला …

Read More »

प्रसाद चौलकर, अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा; 23 दिवसांत 12 राज्ये आणि सात हजार किमीची बाईक राइड

अलिबाग ः प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि …

Read More »