Breaking News

महत्वाच्या बातम्या

खालापुरात अनोख्या निसर्ग शाळेचा शुभारंभ; वीटभट्टी कामगारांच्या मुलांना सहजसेवा फाउंडेशन देणार साक्षरतेचे धडे

खालापूर : प्रतिनिधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सहजसेवा फाउंडेशने रविवारी (दि. 19) खालापूर तालुक्यातील महडफाटा येथील एका वीटभट्टीजवळ  झाडाच्या सावलीत शाळेचा शुभारंभ केला. दर रविवारी भरणार्‍या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जाणार आहेत.  नकुल देशमुख, इशिका शेलार व …

Read More »

नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे मंगेश म्हसकर

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मानकामे यांचा पराभव करून विजय मिळविला. उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि. 20) निवडणूक घेण्यात आली आणि त्यात म्हसकर यांना 11, तर शिवसेनेच्या मानकामे यांना सहा मते मिळाली. पक्षांतर्गत समझोत्यानुसार शंकर घोडविंदे यांनी राजीनामा दिल्याने …

Read More »

किल्ले रायगडावरील महावितरणचे काम रखडले

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा प्रकाश झोतात यावा, संपूर्ण जगाला कळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने रायगड प्राधिकरणची स्थापना करून 600 कोटींचा रायगड विकासाचा आराखडा तयार केला. यामध्ये गडाचे संवर्धन, जतन, पुरातन वास्तूंचे उत्खनन जतन, वीज, आरोग्य, साऊंड सिस्टीम, रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, पर्यटन विकास याचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …

Read More »

पनवेलमध्ये नाट्य उत्सवाला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त मानवता, समता, न्याय, संविधान, शांती आणि लोककल्याणाची गाज असणार्‍या थिएटर ऑफ रेलेवन्सचे 18 व 19 डिसेंबरला दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले. या नाट्य उत्सवाचे पाहिले नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज दिग्दर्शित नाटक सम्राट अशोक हे 18 डिसेंबरला प्रस्तुत झाले. धनंजय कुमार …

Read More »

भाजप दक्षिण भारत सेलच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा समिती सदस्य आणि दक्षिण भारत सेलचे मंडळ संयोजक व सह संयोजक यांचा मेळावा येथील भाजप कार्यालयात रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. या वेळी सेलच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. यासोबत काही महत्त्वाचे मुद्दे सर्वानुमते मान्य करण्यात आले. या वेळी …

Read More »

नवी मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील सहभागाबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी काँग्रेस या संदर्भात भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का? …

Read More »

गव्हाण विद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते पूजन अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितोद्धार कार्याने आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गोरगरीब बहुजनांच्या …

Read More »

पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संजय पाटील

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील पोलीस पाटील संजय गजानन पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल येथे नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात संजय पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात …

Read More »

अवकाळीची भरपाई द्यावी; रब्बी पीक नुकसानग्रस्त शेतकर्यांचे शासनाला साकडे

उरण : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्याने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. उरणमधील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांवरही अवकाळीचे संकट कोसळल्याने त्यांनीही शासनाकडून भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहेे. अवकाळी …

Read More »

Exactly What Is A Decentralized Exchange Dex?

There are particular decentralized exchanges – like dYdX – which leverage metatransactions so that users do not have to pay a transaction fee every time they are trading assets or taking out a position. Decentralized exchanges only work with cryptocurrency assets and not fiat , as allowing crypto-to-fiat would need …

Read More »