Breaking News

नदाल, फेडररची आगेकूच

इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था

जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररनेदेखील विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे.

इंडियन वेल्समध्ये तीन वेळेसच्या विजेत्या नदालने जेयर्ड डोनाल्डसन याचा अवघ्या 72 मिनिटांत 6-1, 6-1 असा पराभव केला. फेडररने जर्मनीच्या पीटर गोजोविकविरुद्ध 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. दुसर्‍या फेरीच्या लढतीत गोजोविकने फेडररला कडवी झुंज दिली.

अन्य लढतीत श्वार्ट्जमन याने स्पेनच्या रॉबर्टो कारबरेल्सवर 6-3, 6-1 अशा सेटने मात केली. जपानच्या केई निशिकोरी याने फ्रान्सच्या एड्रियन मनारिनो याचा संघर्षपूर्ण लढतीत 6-4, 4-6, 7-6 असा पराभव केला. सामना बरोबरीत आल्यानंतर अंतिम सेटमध्ये निशिकोरीने टायब्रेकमध्ये बाजी मारली. पोलंडच्या हर्बर्ट हुरकाज याने फ्रान्सच्या लुकास पाउली याच्यावर 6-2, 3-6, 6-4 अशी मात केली.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply