Breaking News

मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे : पवार

मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष  खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायला हवे. कोरोनामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply