Breaking News

अर्जेटिना, उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत

पोटरे अ‍ॅलॅग्रे ः वृत्तसंस्था

 अर्जेटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने सामन्याच्या पूर्वार्धात चौथ्या मिनिटाला पहिला आणि सर्जिओ एग्युरोने 82व्या मिनिटाला दुसरा गोल केल्यामुळे रविवारी अर्जेटिनाने कतारवर 2-0 असा विजय मिळवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. ब-गटामधून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करणार्‍या कोलंबियाने पॅराग्वेवर 1-0 अशी मात केली. अ-गटामध्ये पेरू संघाला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले, तर क-गटात उरुग्वेला दुसरे स्थान मिळवता आले. अर्जेटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील उपांत्यपूर्व लढत रिओ दी जानेरोच्या प्रतिष्ठित मॅराकाना स्टेडियमवर होणार आहे.

Check Also

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, …

Leave a Reply