Breaking News

पुणेरी पलटणची बंगळुरु बुल्सवर मात

मुंबई ः प्रतिनिधी

बंगळुरु बुल्सच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत पुणेरी पलटण संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात गतविजेत्या बंगळुरु बुल्सला पराभवाचा धक्का दिला आहे. 31-23च्या फरकाने सामन्यात बाजी मारत पुणेरी पलटण संघाने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ केला. मनजीत आणि शहाजी जाधव या तरुण खेळाडूंनी चढाईमध्ये 12 गुण कमावले. बंगळुरु बुल्सच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचे महत्त्वाचे काम पुण्याच्या चढाईपटूंनी केले. बदली खेळाडू अमित कुमारनेही चढाईत 5 गुण मिळवत आपल्या सहकार्‍यांना चांगली साथ दिली. पुण्याकडून कर्णधार सुरजित सिंहने बचावफळीत 6 गुणांची खेळी केली.

बंगळुरु बुल्सच्या बचावफळीने आजच्या सामन्यात निराशा केली. रोहित कुमार आणि पवन शेरावत यांनी चढाईमध्ये पुण्याला झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र अमित शेरॉनचा अपवाद वगळता एकही बचावपटू पुण्याच्या चढाईपटूंवर अंकुश ठेवू शकला नाही. बंगळुरु बुल्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply