Breaking News

Ramprahar News Team

भाजप खारघर मंडल कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाची कार्यकारिणी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्षांपासून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक द़ृष्टीने रायगडचे दोन जिल्हे झाल्यावर खारघरला मंडलाचा दर्जा देण्यात आला असून मंडल अध्यक्ष म्हणून ब्रिजेश पटेल …

Read More »

पवारांनी आयुष्यभर मतांच्या तुष्टीकरणाचे काम केले; सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

मुंबई : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आयुष्यभर शरद पवार यांनी मतांचे तुष्टीकरण करण्याचे काम केले. खुर्चीसाठी पक्ष फोडले, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने …

Read More »

रोहित शर्मा मोटेरा स्टेडियमच्या प्रेमात!

मुंबई : प्रतिनिधी भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या जिममध्ये जोरदार मेहनत घेत आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकलेल्या रोहितचे लक्ष्य आता आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका आणि आयपीएल असणार आहे. वन डे आणि टी-20मध्ये मोठे फटके मारणार्‍या रोहितने सोशल मीडियावरून त्याची एक इच्छा व्यक्त केली आहे. …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त तळवलीत कबड्डी सामने

तळवली ः प्रतिनिधी  महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अलिबाग येथील श्री शिवशंकर ग्रामस्थ मंडळ तळवली (मुंबई) संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) 60 किलो वजनी गटाचे कबड्डी सामने आयोजित केले आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी उपरोक्त संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गायकर यांनी केले आहे. या स्पर्धेत चार विजयी …

Read More »

अजिंक्यने टोचले पंतचे कान; दिला महत्त्वाचा सल्ला

वेलिंग्टन : वृत्तसंस्था भारतीय संघातील यष्टीरक्षक ऋषभ पंत त्याच्या खराब कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात संधी न मिळालेल्या पंतचे कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने कान टोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी एका पत्रकार परिषदेत अजिंक्यने पंतसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. पंतने लवकरात लवकर ही गोष्ट …

Read More »

उमर अकमलला धक्का; ‘पीसीबी’ने केले निलंबन

इस्लामाबाद : वृत्तसंस्था चुकीच्या इंग्रजी वाक्यामुळे विनोदाचा विषय ठरलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याला आणखी एक धक्का बसला आहे. उमर अकमल याला गुरुवारी (दि. 20) पाकिस्तान क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासादरम्यान त्याच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. ‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ आज उमर अकमल याला तत्काळ प्रभावाने निलंबित …

Read More »

भारत-न्यूझीलंड कसोटी; किवींना धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई ः प्रतिनिधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी 20 आणि एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. भारताने टी-20 मालिका जिंकली, तर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या भूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. शुक्रवार (दि. 21)पासून या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. मालिकेसाठी दोन्ही संघ कसून तयारी करीत आहेत. …

Read More »

पोलादपूर तालुक्यात ‘केमिकल लोचा’

पोलादपूर तालुक्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी केलेले प्रयत्न सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समितीने हाणून पाडले होते. यानंतर ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत महाड औद्योगिक वसाहतीच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, मात्र अद्याप त्याचा विधीवत समारंभपूर्वक फलक लागूनही शुभारंभ काही झाला नाही. पोलादपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वीच्या या …

Read More »

रणांगणातील स्त्री-शक्ती

वास्तविक स्त्री आणि पुरुष असा भेदभाव लष्करात असता कामा नये असे बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संरक्षण दलांमधील सुधारणांना वाट करून दिली होती. त्याचीच परिणती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये झालेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ताबडतोब ट्वीट करून राहुल गांधी यांचे अज्ञान दूर केले हे बरेच झाले. स्त्रीला पोथ्या-पुराणांमध्ये देवत्वाचा …

Read More »

पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलिंग अभियान; सिस्केप व युथ हॉस्टेलचा उपक्रम; 25 विद्यार्थ्यांचा सहभाग

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बुधवारी (दि. 19)  शिवजयंतीचे औचित्य साधून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सायकल अभियानाला सुरुवात झाली. महाडच्या हुतात्मा स्मारकात 21 फेब्रुवारीला या अभियानाची सांगता होणार आहे. युथ हॉस्टेल व सिस्केप संस्थेने समृध्द पर्यावरणासाठी तीन दिवस सायकल अभियानाचे आयोजन केले …

Read More »